महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑगस्ट ।। सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये नागरिकांना आर्थिक मदत मिळते. त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने योजना राबवली जाते. कोणत्याही कंपनीत काम करणाऱ्या लोकांना पेन्शनचे पैसे मिळतात. परंतु असंघटित क्षेत्रातील लोकांना पेन्शन मिळत नाही. याच लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने ई-श्रम योजना राबवली आहे. (E-Shram Card)
ई-श्रम योजनेअंतर्गत कामगारांना प्रत्येक महिन्याला ठरावीक रक्कम दिली जाते. त्यांचे भविष्य आर्थिकदृष्टया सुरक्षित व्हावे, या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना ६० वर्षांनंतर पेन्शन दिली जाते.
ई- श्रम कार्डद्वारे ३० व्यापक व्यवसाय आणि ४०० व्यवसायाअंतर्गत नोंदणी झालेल्या कामगारांना मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना ३००० रुपयांची पेन्शन मिळते. या योजनाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना ई-श्रम कार्ड बनवून घ्यावे लागेल. (E-Shram Card Scheme)
सरकारने २०२१ मध्ये ही योजना सुरु केली होती. या योजनेत आतापर्यंत २९.२३ कोटी कामगारांनी अर्ज केला आहे. या योजनेत कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास २ लाख रुपये दिले जातात. तर अपंगत्व आल्यास १ लाख रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत तु्म्ही ई-श्रमच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.