Australia U19 Women’s Squad: भारतीय वंशाच्या लेकी कांगारूच्या ताफ्यात ; पाहा कोण आहेत या खेळाडू?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑगस्ट ।। क्रिकेट ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड आणि श्रीलंका विरुद्ध १९ वर्षांखालील महिलांच्या तिरंगी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा केली. ही मालिका १९ सप्टेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होणार आहे. ब्रिस्बेन आणि गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी युवा निवड समितीने प्रत्येक फॉरमॅटसाठी (टी-२० आणि वनडे) १५ खेळाडूंचा संघ निवडला आहे. या संघामध्ये भारतीय वंशाच्या तीन महिला खेळाडूंचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाची माजी खेळाडू क्रिस्टन बीम्सला संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. १४ दिवसांच्या या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलिया चार टी-२० आणि दोन एकदिवसीय सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात भारतीय वंशाच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे: रिबिया सायन, समारा दुल्विन आणि हसरत गिल अशी त्यांची नावे आहेत. याबाबत सीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “त्यांच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील वाढती विविधता आणि भारतीय वंशाच्या खेळाडूंच्या महत्त्वाचे योगदान दिसून येते.”

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघात ३ ‘भारतीय’ खेळाडूंना स्थान
भारतीय वंशाची खेळाडू रिबिया सायन ही व्हिक्टोरियाची वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. तर, समारा डल्विन ही एक फलंदाज आहे जी यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळली आहे. त्याचबरोबर हसरत गिलचाही गोलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. हसरत गिलने इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या १९ वर्षांखालील सामन्यांमध्येही ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे.

ऑस्ट्रेलिया अंडर-१९ (महिला) त्रिकोणी मालिकेसाठी संघ जाहीर
टी-२० क्रिकेट संघ:
बोनी बेरी, काओम ब्रे, एला ब्रिस्को, मॅगी क्लार्क, समारा डल्विन, लुसी फिन, हसरत गिल, लुसी हॅमिल्टन, एमी हंटर, एलेनॉर लारोसा, इनेस मॅककिन, रिबिया सायन, टेगन विल्यमसन, एलिझाबेथ वर्थले आणि हेले जेउच

ऑस्ट्रेलियन अंडर-१९ महिलांचा एकदिवसीय संघ
बोनी बेरी, काओम ब्रे, एला ब्रिस्को, मॅगी क्लार्क, समारा डल्विन, लुसी फिन, हसरत गिल, एमी हंटर, एलेनॉर लारोसा, इनेस मॅकिओन, ज्युलिएट मॉर्टन (NSW), रिबिया सायन, टेगन विल्यमसन, एलिझाबेथ वर्थले, हेली जेउच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *