Gratuity: पाच वर्षे एकाच कंपनीत थांबण्याची गरज नाही, त्यापूर्वीही मिळणार ​ग्रॅच्युइटी, कसं? जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ ऑगस्ट ।। खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये ग्रॅच्युइटीबाबत नेहमीच संभ्रम पाहायला मिळतो. यापैकी ग्रॅच्युइटी कशी मोजली जाते तसेच किती वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युरिटी मिळते यावरच सर्वाधिक चर्चा रंगते. साधारणपणे संस्थेत सलग पाच वर्षे काम केल्यानंतर ग्रॅच्युइटी दिली जाते, हे सर्वांनाच माहीत आहे.

तुम्हीपण खाजगी नोकरी करत असाल तर तुम्हाला माहित असले पाहिजे की पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या नोकऱ्यांमध्येही ग्रॅच्युइटी मिळते. यासाठी काही खास नियम असून तुम्हाला आजच्या या लेखात ग्रॅच्युइटीशी संबंधित काही प्रश्न असल्यास तुमची उत्तरे खाली सापडतील.

ग्रॅच्युइटी म्हणजे काय?
कंपनीकडून कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी दिली जाते. ग्रॅच्युइटी म्हणेज कंपनी कर्मचाऱ्यांना सततच्या सेवेच्या बदल्यात आभार व्यक्त करण्याची पद्धत म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटीच्या रूपात मोठा आर्थिक आधार मिळतो. पेमेंट आणि ग्रॅच्युइटी कायदा देशातील सर्व कारखाने, खाणी, तेल क्षेत्र, बंदरे आणि रेल्वे यांना लागू होतो. यासोबतच दहापेक्षा जास्त लोकांना काम करणाऱ्या दुकाने आणि कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनाही ग्रॅच्युइटी अनिवार्य आहे.

किती वर्षांनी ग्रॅच्युइटी मिळते?
कोणत्याही संस्थेत पाच वर्षे सतत काम करणारे कर्मचारी ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात पण, काही प्रकरणांमध्ये ग्रॅच्युइटीचा लाभ पाच वर्षांपेक्षा कमी सेवेसाठीही उपलब्ध आहे. ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम 2A मध्ये ‘सतत कामा’ची व्याख्या स्पष्ट करण्यात आली असून यानुसार अनेक कर्मचाऱ्यांनी पूर्ण पाच वर्षे काम केले नसले तरी त्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळू शकतो.

ग्रॅच्युइटीचा लाभ पाच वर्षापूर्वी मिळतो का?
वर नमूद केल्याप्रमाणे ग्रॅच्युइटी कायद्याच्या कलम-2A नुसार जर भूमिगत खाणींमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मालकासोबत सतत चार वर्षे आणि १९० दिवस पूर्ण केले आहेत तर त्यांना ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. तसेच इतर संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी चार वर्षे २४० दिवस (म्हणजे ४ वर्षे ८ महिने) काम केल्यानंतर ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरतात.

दरम्यान, नोटीसचा कालावधी ग्रॅच्युईटीच्या गणनेत गणला जातो की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. नियमानुसार नोटीस कालावधी ‘सतत सेवा’मध्ये मोजला जातो, म्हणून नोटीस कालावधी ग्रॅच्युइटीमध्ये जोडला जातो. लक्षात घ्या की आत्तापर्यंतच्या नियमांनुसार ग्रॅच्युइटीसाठी, कर्मचाऱ्याने कंपनीत पाच वर्षे सतत काम करणे आवश्यक आहे मात्र, केंद्र सरकार कालावधी तीन वर्षांपर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *