महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० ऑगस्ट ।। रोज लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करताना अनेक अडचणी येतात. यात सर्वात जास्त अडचणी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना येतात. सामान्यतः रेल्वेत तीन बर्थ असतात. त्यात अपर बर्थ म्हणजेच सर्वात बरच्या सीटवर बसण्यासाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच आता रेल्वेने नवीन नियम लागू केला आहे.
ज्येष्ठ नागरिकांचा रेल्वेमधील प्रवास सुखकर व्हावा यासाठी लोवर बर्थ म्हणजेच सर्वात शेवटची खालच्या बाजूची सीट ही आरक्षित करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ट्रेनमधील लोवर बर्थ आरक्षित करण्यात आली आहे. IRCTC ने याबाबत काम सुरु केले आहे. IRCTC च्या वेबसाइटवर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी लोवर बर्थ सीट बुक करतात.
एका प्रवाशाने रेल्वेला टॅग करत ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत माहिती दिली होती. त्यालाच रिप्लाय देत प्रवाशाने ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट कसं बुक करायचं ते सांगितलं आहे.
सर्वप्रथम तुम्ही आयसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन तिकीट बुक करा. त्यासाठी सामान्य कोटामधून तिकीट बुक करा.
तिथे ज्येष्ठ नागरिकांसाठी लोवर बर्थ अलॉट केले आहेत. त्यानंतर जर सीट असेल तरच तुम्हाला लोवर बर्थ सीट मिळेल.
जर तुम्ही आरक्षितमधून तिकीट बुक केले आणि तिथे लोवर बर्थ अलॉट केले असेल तरच तुम्हाला ती सीट मिळेल.
जो व्यक्ती सर्वप्रथम तिकीट बुक करेल त्याला प्राधान्य दिले जाते. त्यानंतरच तुम्हाला सीट मिळेल.