Garlic Price: लसणाच्या दरांचा मोठा भडका ; किरकोळ बाजारात दर थेट ४०० रुपयांवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० ऑगस्ट ।। सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा लसणाची फोडणी महागली आहे. किरकोळ बाजारात सध्या लसूणचा दर थेट 400 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे.येणाऱ्या पुढील सणासुदीच्या काळात हा भाव आणखी वाढून 600 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचू शकतो, अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.त्यामुळे आता गृहिणींचे बजेट कोलमडणार हे नक्की.

सर्वसामान्यांसाठी पुन्हा एकदा लसणाची फोडणी महागली आहे. किरकोळ बाजारात(market) सध्या लसूणचा दर थेट ४०० रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे.येणाऱ्या पुढील सणासुदीच्या काळात हा भाव आणखी वाढून ६०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहचू शकतो, अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.त्यामुळे आता गृहिणींचे बजेट कोलमडणार हे नक्की.

लसणाला आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र,यंदा लसणाची आवक(income) कमी झाल्याने दर वाढतायत.जुन्या लसणाची आवक जवळपास संपली असून नवीन लसूण उपलब्ध नसल्याने सध्या बाजारात लसणाचे दर प्रचंड वाढलेले आहेत.यावर्षी देशातील लसणाच्या उत्पादनात घट होत असल्याने भाव वाढत आहेत. आधीच महागाईने सर्वसामान्य नागरिक काटकसर करून आयुष्य जगत आहेत.

महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांनी एवढा महागडा (expensive)लसूण विकत घ्यायचा तरी कसा,असा प्रश्न सध्या सर्वसामान्याला सतावत आहे.दरम्यान,यापूर्वी जानेवारी महिन्यात सुद्धा लसणाच्या दरांचा मोठा भडका उडाला होता. वाढलेला भाव कमी झाल्यानंतर आता पुन्हा ऑगस्टमध्ये भाव वाढले आहेत.बाजारात सध्या लसूण ४०० रुपयांनी किरकोळ बाजारात विकला जातोय.तर घाऊक बाजारात लसणाचा दर कमाल ३०० रुपयांपर्यंत वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

लसूणच्या किंमती महाग झाल्यानंतर आता परत लसणाच्या किंमती कधी कमी होतील असा प्रश्न नागरिकांना भेडसावद आहे. जानेवारी महिना ते मे महिना या कालावधीत लसणाचे उत्पादन केले जाते. तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत आवक सुरळीत होते.या सर्वांचा परिणाम प्रत्येक नागरिकाला महागडा लसूण खावा लागणार आहे.मुख्यत महाराष्ट्रात(Maharashtra) मध्य प्रदेश,राजस्थान, गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथून लसणाची आवक होत असते.भाव वाढत असल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसणार ने निश्चित झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *