Triple-E Mosquito Virus: अमेरिकेत वाढतोय “ट्रिपल ई ” मॉस्किटो व्हायरस, जाणून घ्या लक्षण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० ऑगस्ट ।। अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरमध्ये डासांमुळे पसरणाऱ्या दुर्मिळ विषाणूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा विषाणू अत्यंत दुर्मिळ असून प्राणघातक आहे. अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर आणि मॅसॅच्युसेट्ससह आसपासच्या राज्यांमध्ये डासांमुळे होणारा ट्रिपल ई विषाणूचा संसर्ग पसरला आहे, असा अमेरिकन प्रशासनाचा विश्वास आहे. या राज्यांना हाय अलर्ट देण्यात आले आहे. या विषाणूचे लक्षण कोणती आहेत आणि हा आजार कसा पसरतो हे सोप्या शब्दात जाणून घेऊ या.

ट्रिपल ई व्हायरस म्हणजे नेमकं काय?
‘EEEV’ म्हणजेच ईस्टर्न इक्वीन इंसेफलाइटीस व्हायरसला ट्रिपल ई असेही म्हणतात. 1938 मध्ये सापडलेल्या या विषाणूचा संसर्ग अत्यंत दुर्मिळ परंतु धोकादायक आहे. तेव्हापासून, न्यू हॅम्पशायरमध्ये 118 लोकांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत 64 जणांचा मृत्यू झाला आहे. मानवांमध्ये हा विषाणूमुळे मेंदूला सूज येते आणि वेदना होतात.

या आजाराची लक्षणे कोणती?
ताप येणे

डोकेदुखी

उलट्या होणे

जुलाब

चक्कर येणे

थकवा

निद्रानाश

हा विषाणू कुठे आढळतो?
हा विषाणू उत्तर अमेरिका आणि कॅरिबियनमध्ये आढळून आला. अमेरिकेत ते प्रथम पूर्वेकडील आणि आखाती किनारपट्टीच्या राज्यांतील लोकांमध्ये आढळला आहे. येल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे असोसिएट रिसर्च सायंटिस्ट व्हेरिटी हिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विषाणू अनेक प्रजातींच्या पक्ष्यांकडून ते डासांच्या माध्यमातून मानवांमध्ये पसरते. हा विषाणू सामान्यतः काळ्या शेपटीच्या डासाद्वारे पसरत असतो. पूर्व अमेरिका, मेक्सिको आणि कॅरिबियनमध्ये या विषाणूनचे रूग्ण आढळतात.

हा विषाणू कसा पसरतो?
हा विषाणू जंगलात असलेल्या चिखलात राहणाऱ्या किंवा स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या विविध प्रजातींमध्ये आढळतो. मानवांना आणि इतर सस्तन प्राण्यांना संक्रमित करणाऱ्या डासांच्या काही प्रजाती ट्रिपल ई विषाणूने संक्रमित होतात.

हा विषाणू किती धोकादायक आहे ?
ट्रिपल ई विषाणूची लागण क्वचितच लोकांमध्ये होते. 2003 ते 2023 पर्यंत अमेरिकेत 196 रूग्णांची नोंद केली गेली आहेत. दरवर्षी सुमारे 11 प्रकरणे नोंदवली जातात. या विषाणूचा सर्वात धोकादायक संसर्ग 2019 मध्ये पसरला, जेव्हा 38 प्रकरणे नोंदवली गेली. ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *