महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० ऑगस्ट ।। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. NHAI मध्ये महाव्यवस्थापक (तांत्रिक), उपमहाव्यवस्थापक (तांत्रिक), मॅनेजर (तांत्रिक) या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.
NHAI मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. nhai.gov.in या साइटवर जाऊन अर्ज करावेत.ही भरती ६० पदांसाठी होणार आहे. जनरल मॅनेजरसाठी २० पदे आहेत. डेप्युटी जनरल मॅनेजरसाठी २० पदे आहेत तर मॅनेजर पदासाठी २० रिक्त जागा आहेत.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय ५६ पेक्षा जास्त नसावे.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६७,७०० रुपये ते २ लाख १५ हजार ९०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑक्टोबर २०२४ आहे.
या नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुम्हाला डीजीएम (एचआर/अॅडमिन), भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, प्लॉट नंबर जी ५ आणि ६, सेक्टर १० द्वारका, नवी दिल्ली-११००७५ येथे अर्ज पाठवायचा आहे.