पीओपीची गणेशमूर्ती सार्वजनिक मंडपात नको; सर्व महापालिकांना आदेश द्या : हायकोर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ ऑगस्ट ।। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२० मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना द्या. ज्यांना मंडपाची परवानगी दिली आहे, त्यांना पीओपी मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याची अट असल्याचे कळवा आणि ज्यांना अद्याप परवानगी दिली नाही, त्यांना तशी पूर्व अट घाला, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी सर्व महापालिकांना दिले.

घरगुती मूर्तींबाबत आदेश देण्यास नकार
– घरगुती पीओपीच्या मूर्तींबाबत काहीही आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्याशिवाय मूर्तिकारांनाही पीओपीच्या मूर्ती विक्रीस मनाई करण्याचे आदेश देण्यास तूर्तास नकार दिला.
– परंतु, अशा मूर्ती बनवण्यावर जरब बसावी यासाठी दंडात्मक कारवाईसारखा धोरणात्मक निर्णय घेण्याचा निर्देश मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले.

पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार
– पीओपीच्या मूर्तींबाबत नागपूर खंडपीठाने स्वयंप्रेरणेने दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवरील आदेश न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
– त्यानंतर न्यायालयाने या याचिकेवर राज्य सरकार, महापालिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *