Pune News: पुण्यातल्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; विशेष रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ, ‘या’ गाड्यांचा समावेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ ऑगस्ट ।। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दौंड-अजमेर आणि सोलापूर-अजमेर या दोन साप्ताहिक गाड्यांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दौंड अजमेरच्या २६ आणि सोलापूर-अजमेर १८ फेऱ्या वाढणार आहेत. साईनगर शिर्डी-बिकानेरच्या २६ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

अजमेर-दौंड-अजमेर साप्ताहिक (ट्रेन क्रमांक ०९६२६) विशेष गाडीच्या २६ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. दौंड-अजमेर साप्ताहिक विशेष ट्रेन २० ऑगस्टपर्यंत दर शुक्रवारी अधिसूचित करण्यात आली होती. ती आता सहा सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर २०२४पर्यंत १३ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. अजमेर-दौंड साप्ताहिक (ट्रेन क्रमांक ०९६२५) विशेष ट्रेन पूर्वी २९ ऑगस्टपर्यंत दर गुरुवारी अधिसूचित करण्यात आली होती. आता पाच नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२४पर्यंत १३ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *