पाच राऊंड फायर केले, पण एकही गोळी लागली नाही…; मग वनराज आंदेकरांचा मृत्यू नेमका कसा झाला?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ सप्टेंबर ।। Vanraj Andekar Pune Crime: पुण्यातील नाना पेठेत रविवारी पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला. वनराज आंदेकर यांच्यावर 5 राऊंड फायर करण्यात आले. तसेच हल्लेखोरांनी कोयत्याने देखील वार केले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

नाना पेठेत 14 ते 15 हल्लेखोर दुचाकी घेऊन आले. यावेळी एका मित्रासोबत उभे असलेले वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या अंगावर धावून जात हल्लेखोरांनी गोळीबार (Pune Crime News) करण्यास सुरुवात केली. काहीजण कोयता घेऊन त्यांच्या अंगावर गेले. सदर घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलं आहे. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एकही गोळी लागली नाही, पण…
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर यांना पाच राऊंडपैकी एक देखील गोळी लागली नाही. मात्र गोळीबारानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील हल्ला केल्यानंतर काहीजण दुचाकीवरुन पुन्हा खाली उतरत कोयता घेऊन वनराज आंदेकर यांच्या दिशेन धाऊन जात असल्याचे दिसत आहे. सदर घटनेनंतर वनराज आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, वनराज आंदेकर यांच्यावर निकटवर्तीयाने गोळीबार केला असून, कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा आहे.

सीसीटीव्हीमध्ये नेमकं काय?
सदर घटनेचं भयानक सीसीटीव्हीचं फुटेज समोर आलं आहे. नाना पेठेत वनराज आंदेकर आणि त्यांच्यासोबत एक जण उभे होते. यावेळी जवळपास सात दुचाकीवरुन जवळपास 14 ते 15 जण येतात आणि वनराज आंदेकर यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी हल्लेखोरांच्या हातामध्ये बंदुका आणि कोयता असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येतंय. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करुन सर्व घटनास्थळावरुन पळ काढतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *