महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ सप्टेंबर ।। भाजपचे आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. चितावणीखोर आणि भडखाऊ भाषण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहमदनगरमध्ये दोन गुन्हे तर पुण्यामध्ये त्यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी मुस्लिमांना मारणार असल्याची धमकी दिली होती. नितेश राणे यांनी सभेदरम्यान मुस्लिमांना जाहीर धमकी दिल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.