Pune District Dams : पुणे जिल्ह्यातील 12 धरणे काठोकाठ भरली, इतर धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा? पहा …

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ सप्टेंबर ।। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात संपूर्ण जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. सप्टेंबरमध्ये देखील पुण्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठा पाणीसाठा जमा झालाय. ताज्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील २६ धरणांपैकी‌ तब्बल १२ धरणे १०० टक्के भरली आहेत.

तर ११ धरणांमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. भीमा खोऱ्यातील २६ धरणांपैकी‌ सात धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आलाय. यासह काही धरणातून वीज निर्मिती आणि कालव्यातून पाणी सोडले जात आहे. भामा- आसखेड, माणिकडोह, पिंपळगाव- जोगे, वडज, डिंभे, येडगाव, चासकमान या सात धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

तर येडगाव, विसापूर, चासकमान, वीर, नाझरे डिंभे, घोड, खडकवासला उजनी या धरणाच्या कालव्यातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी सोडण्यात आलेले आहे. भीमा नदीत बंडगार्डन येथे पाच हजार ४३८ तर दौंड येथे सात हजार ३०९ क्युसेक विसर्ग सुरु आहे. नीरा नदीत निरा नरसिंगपूर येथे २३ हजार ३३९ क्युसेक विसर्ग सुरु आहे. चंद्रभागा नदीत पंढरपूर येथे १७ हजार ७०९ क्युसेक विसर्ग सुरु आहे.

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा?
खडकवासला – ९३.३१ टक्के पाणीसाठा

मुळशी – ९९.९२ टक्के पाणीसाठा

कासारसाई – १०० टक्के पाणीसाठा

कळमोडी – १०० टक्के पाणीसाठा

आंद्रा – १०० टक्के पाणीसाठा

वडिवळे – १०० टक्के पाणीसाठा

नाझरे – १०० टक्के पाणीसाठा

चिल्हेवाडी – १०० टक्के पाणीसाठा

घोड – ३६ टक्के पाणीसाठा

विसापुर – १०० टक्के पाणीसाठा

उजनी – १०० टक्के पाणीसाठा

वीज निर्मितीसाठी धरणांमधून विसर्ग (क्युसेकमध्ये)
टेमघर- २७५/३.७१/१००

वरसगाव- ६००/१२.७१/१००

पानशेत- ६००/१०.५४/१००

पवना- १४००/८.५१/१००

गुंजवणी- २५०/३.५६/९६.३९

भाटघर- १२४८/२३.४३/९९.६९

नीरा देवधर- ७५०/११.६८/९९.५७

वीर- १३५०/९.४१/१००

उजनी-१६००/५३.५७/१००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *