महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ सप्टेंबर ।। पुण्यात भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे नदी पात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. गणेशोत्सवासाठी खरेदीला येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडी सहन करावी लागू शकते. 16,159 क्युस्केस इतका विसर्ग सध्या खडकवासला धरणातून सुरू आहे. खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे मुठा नदीत विसर्ग सुरू आहे.
मागील महिन्यात पुण्यात मुसळधार पाऊस झाला होता. पूरस्थिती निर्माण झाल्यानं पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं. आता जरी पुण्यात पावसानं ब्रेक घेतला आहे, तरी देखील घाटमाथ्यावर पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. नांदेड, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.