Mumbai-Goa Highway Traffic Video: “दरवर्षी प्रमाणे या वर्षीही गणेशोत्सवात तेच…” मुंबई-गोवा मार्गावर चार तासांपासून वाहतूक कोंडी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०६ सप्टेंबर ।। गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात व गोव्याकडे निघालेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. सकाळपासून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, मानगाव ते महाड दरम्यान गेल्या चार तासांपासून प्रवासी अडकून पडले आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये मोठा संताप पहायला मिळत आहे.

दरम्यान या वाहतूक कोंडीचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दोन व्हिडिओ शेअर करत एका युजरने लिहिले की, “माणगाव ते महाड दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या 4 तासांपासून वाहतूक कोंडीत अडकलो आहे. महामार्गावर वाहतुकीचे कोणतेही व्यवस्थापन नाही. गाड्या कशाही पार्क करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शक्य असल्यास हा मार्ग टाळावा.”

मुंबई, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या भागातील रहिवाशांनी गणेशोत्सवाला गावी जाण्यास सुरुवात केली आहे, मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. यावेळी काही प्रवासी तासोंतास त्याच ठिकाणी अडकून पडल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रत्येक गणेशोत्सवात…
या मार्गावर कालही अशीच परिस्थिती आणि प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला होता. याचा व्हिडिओ शेअर करत प्रवासी म्हणाला की, “मुंबई-गोवा महामार्ग वर्षानुवर्षे अपूर्णच आहे. प्रत्येक गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. हा प्रकल्प कधी पूर्ण होणार आणि महाराष्ट्र सरकार या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पाला केव्हा प्राधान्य देणार?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *