महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ सप्टेंबर ।। कोकणात गणेशोत्सवसाठी निघालेल्या लाखो गणेशभक्तांना अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यामुळे महामार्गावर कोलाड, इंदापूर, माणगाव शहर, लोणेरे येथे अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मध्य-पश्चिम-कोकण रेल्वेने तब्बल 342 गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त आहेत. या गाड्यांनी तब्बल साडेचार लाख चाकरमानी कोकणात जाणार आहेत. गेल्यावर्षी 312 गणपती स्पेशल गाड्या चालविण्यात आल्या होत्या. त्यातून साडेतीन लाख चाकरमान्यांनी कोकण गाठले होते. कोकणात येणार्या बसेसची संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या स्थानकात असलेल्या सीएनजी पंपामध्ये पर्यायी गॅसची उपलब्धता करून ठेवणे गरजेचे होते. मात्र तसे न केल्याने कोकणात निघालेल्या गणेश भक्तांना महाड एस टी स्थानक परिसरात तीन ते चार तास ताटकळत राहावे लागले. यामुळे महामार्गावर कोलाड, इंदापूर, माणगाव शहर, लोणेरे येथे अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या.
रेल्वेप्रमाणेच यंदा एस.टी. महामंडळानेदेखील गणपती स्पेशल गाड्यांची संख्या वाढविली आहे. गेल्यावर्षी 4 हजार 300 गणपती स्पेशल गाड्यांनी दोन लाख चाकरमानी कोकणात गेले होते. यंदा तब्बल 4 हजार 500 एस.टी. बसेसमधून सुमारे अडीच लाख कोकणावासीय प्रवास करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 3 हजारहून अधिक एस.टी. बसेस येणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक हजार एस.टी. बसेस येणार आहेत. 5 सप्टेंबरला सर्वाधिक एसटी बसेस कोकणात येणार आहेत. 6 सप्टेंबरला एक हजार, 7 रोजी 300 गाड्या कोकणात दाखल होणार आहेत.
चाकरमान्यांना कोकणात सुखरुप पोहोचविण्यासाठी 4 हजार 500 एसटी बसेस धावणार आहेत. दरम्यान, गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून पिण्याचे पाणी, तात्पुरते शौचालय, स्वच्छता आदी बाबत प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. परतीसाठी गौरी गणपती विसर्जनापासून 12 तारखेपासून जादा गाडयांचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत 1700 गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. परतीच्या प्रवासासाठी दोन हजारांपेक्षा जास्त गाड्या सोडण्यात येणार आहे.