महाराष्ट्र 24 – पिंपरी चिंचवड- दि. 9 सप्टेंबर- *मोरवाडी येथील लालटोपीनगर झोपडपट्टीतील घरेलु कामगार सदस्यांना एनजीओ संस्था मार्फत सौ. रेणुकाताई दिपक भोजने यांच्या प्रयत्नातून व कविता वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार रेणुका भोजने , कविता वाघमारे व दिपक भोजने यांच्या हस्ते रेशन वाटप करण्यात आले त्यात गहू , तांदुळ , तेलपुडा , साखर ,चहा पत्ती , मसुरदाळ, मीठ इ. देण्यात आले काही दिवसापूर्वी लालटोपीनगर झोपडपट्टीत पावसाचे पाणी झोपडपट्टीत शिरले होते घरेलू कामगार सदस्यांना मदत मिळावी म्हणून रेणुका भोजने या प्रयत्न करीत होत्या या भागातील जवळपास २५० ते ३०० घरेलु महिला सदस्य आहेत कविता वाघमारे मॅडम यांनी घरेलु महिलांच्या विविध समस्यांबाबत महिती दिली व लढा लढून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांना रेणुका भोजने व दिपक भोजने यांची साथ मिळत आहे.