Liquor License : तुम्हाला माहितीय का? दारू पिण्यासाठी लागतंय लायसन्स? ; पहा काय आहे प्रक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ सप्टेंबर ।। अनेकदा आपण थेट दुकानात जावून खरेदी करतो किंवा बार किंवा पबमध्ये जाऊन दारू पितो. दारू विकणाऱ्या व्यापाऱ्यांना अधिकृत परवान्याची गरज असते, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याचप्रमाणे दारू खरेदी करणाऱ्यांना देखील परवान्याची गरज असते. हा परवाना मिळाल्यानंतर कुठेही जाऊन दारू विकत घेता येते. आज आपण हा परवाना कसा बनवला जातो? तो का गरजेचा आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

हा परवाना काय आहे?
सरकार लोकांना दारू पिण्यासाठी आणि दारू विकत घेण्यासाठी आता परवाना देत आहे. या परवान्याला ऑल इंडिया लिकर परमिट असं म्हणतात. हे एक प्रकारचे कायदेशीर दस्तऐवज आहे. हे लायसन्स असेल तर तुम्ही दारू पिण्याशी संबंधित कायदेशीर समस्या टाळू शकता. अनेक अहवालांनुसार, जेव्हा मोठ्या संख्येने दारू पिणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाते, तेव्हा या परवानगीचीही मागणी केली जाते, अशी माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळतेय.

हे लायसन्स का बनवावं?
ऑल इंडिया लिकर परमिटबाबत प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात दारू पिण्यासाठी परवाना आवश्यक आहे, पण दिल्लीत तसे नाही. पार्टीत किंवा लग्नात दारू प्यायल्यास, परमिट देण्याची शिफारस केली जाते. ऑल इंडिया लिकर परमिटद्वारे मद्य खरेदी आणि सेवन कायदेशीर आहे. जर कोणी दारू पिण्याशी संबंधित कायदेशीर बाबींमध्ये अडकत असेल तर त्यांच्यासाठी ही परवानगी खूप उपयुक्त आहे. या परमिटने तुम्ही नियमानुसार मद्य घेऊन प्रवास करत असाल तर तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही.

हा परवाना कुणाला बनवता येतो?
भारतातील प्रत्येक राज्याचे दारूबाबत स्वतःचे नियम आहेत. प्रत्येक राज्याचे मद्य धोरण वेगळे असल्यामुळे दारू पिण्याचे किमान वय देखील वेगळे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या राज्याच्या नियमांनुसार मद्य परमिट मिळवू शकता. भारतात दारू पिण्याचे किमान वय १८ ते २५ वर्षे आहे, तरी यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना हा परवाना मिळू शकतो. पण, बिहार, गुजरात, मिझोराम यांसह अनेक राज्यांमध्ये दारूवर बंदी आहे.

हा परवाना कसा बनवला जातो?
तुम्ही ऑल इंडिया लिकर परमिट ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून मिळवू शकता. तुम्हाला दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतो. हा परवाना मिळविण्यासाठी नागरिकत्व आणि वयाशी संबंधित कागदपत्रे आवश्यक आहेत. या कागदपत्रांच्या मदतीने परवाना बनवता येतो. महाराष्ट्राप्रमाणे तुम्ही ऑनलाइन माध्यमातून परवाना मिळवू शकता. यासाठी तुम्ही aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करून आणि कागदपत्रे जमा करून परवाना मिळवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *