महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ सप्टेंबर ।। महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे. या योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट होती.मात्र, ही मुदत आता वाढवण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत महिला या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

ज्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता आला नाही त्या महिला आता अर्ज करु शकतात. या योजनेत सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना आधीच्या दोन महिन्याचे म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचाही हप्ता मिळणार आहे.म्हणजेच महिलांना एकूण ४५०० रुपये मिळणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना मदत केली जाते. या योजनेत २.५ कोटी महिलांचा समावेश केला जाईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी घोषणा केली होती. राज्य सरकारने आतापर्यंत १.७ कोटी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेत निधी जमा केला आहे.
लाडकी बहीण योजना
या योजनेत २१ ते ६५ वयोगटातील महिला, अवावहित महिला, विधवा या महिला अर्ज करु शकतात. अर्जदार महिलांच्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे. महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे.