महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ सप्टेंबर ।। शरद पवारांना देण्यात येणाऱ्या केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात मोठी अपडेट. सुरक्षा घेण्याआधी शरद पवारांनी केंद्रापुढे ठेवल्यात काही अटी. शरद पवारांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत झाली बैठक, केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार,,कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार, शिवाय स्वतःच्या खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार, यासह काही अटी शर्थीचे पत्र शरद पवारांकडून केंद्राला सादर ,या अटी मान्य केल्यावर पवारांकडून केंद्राची सुरक्षा घेण्याचा विचार केला जाणार .