महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ सप्टेंबर ।। महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत कुटुंबियांना अन्नधान्यांचे मोफत वाटप केले जाते. त्याचसोबत नागरिकांना मोफत सिलेंडरदेखील मिळणार आहे. पाच सदस्यांच्या कुटुंबाला वर्षाला ३ सिलेंडर मोफत मिळणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबियांना फायदा होणार आहे.
सरकारची नवी योजना? जाणून घ्या…
राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना आवश्यक वस्तू मोफत मिळाव्यात, या उद्देशातून ही योजना राबवण्यात आली आहे. राज्यातील दुर्बल घटकातील लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी आर्थिक मदत म्हणून ही योजना राबवण्यात आसी आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत नागरिकांना स्वस्त दरात पौष्टिक अन्नपदार्थ दिले जातात. यामध्ये गहू, तांदूळ अशा जीवनावश्यक गोष्टी कमीत कमी दरात दिल्या जातात. तसेच ६५ वर्षांवरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत १० किलो धान्य देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण होणार आहेत.
अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता महिलांना ३ सिलिंडर मोफत मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर सिलिंडरची जोडणी असणे गरजेचे आहे. एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.१४.२ किलोग्रॅम वजनाच्या सिलिंडरची जोडणी असणारे ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.