Vande Bharat Express : पुण्यातून या मार्गावर वंदे भारत धावणार, तिकिट किती, थांबा कुठे? जाणून घ्या डिटेल्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ सप्टेंबर ।। बहुप्रतिक्षेत असलेली पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस सुरुवातीला १५ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू होणार होती. ती आता १६ सप्टेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आलीय. या नवीन हाय-स्पीड ट्रेनमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यानचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. पुणे आणि हुबळी शहरांना जोडणारी वंदे भारत ट्रेन आणि सात प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे.

वंदे भारत एक्सप्रेसमुळे जलद आणि अधिक आरामदायी प्रवास होणार आहे. पुणे ते हुबळी या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना आरामदायी आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी आठ आधुनिक डबे (Pune Railway) आहेत. वंदे भारत ट्रेन त्यांच्या प्रगत तंत्रज्ञानासाठी आणि प्रवासी-अनुकूल वैशिष्ट्यांमुळे चर्चेत आहे. ट्रेनमध्ये आरामदायी सीट्स, आधुनिक अंतर्भाग आहेत. या नवीन सेवेमुळे प्रवासी पुणे ते हुबळी दरम्यान प्रवास करण्यासाठी अधिक आनंददायी वातावरणाचा अनुभव करतील.

पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसचे थांबे कोणते?
पुणे आणि हुबळी दरम्यान सुरू होणारी नवीन वंदे भारत ट्रेन ही सरकारच्या देशभरातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या उपक्रमाचा एक भाग आहे. पुणे आणि हुबळी सारख्या प्रमुख शहरांना जोडून वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यास मदत करणार असल्याची अपेक्षा (Pune Hubli Vande Bharat) आहे. ट्रेन या मार्गावरील धारवाड, बेळगाव, कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा आणि कराड या ठिकाणी थांबे घेणार आहे. ही शहरे आपापल्या राज्यातील महत्त्वाची व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्रे आहेत. त्यामुळे प्रादेशिक संपर्क वाढवण्यासाठी प्रवाशांना फायदा होणार आहे.

पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील विविध शहरांमधील प्रवाशांना सेवा देणार आहे. यामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होईल, असं सांगितलं जातंय. पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसचं प्रवाशांसाठी असलेलं वेळापत्रक समोर आलंय. ही ट्रेन हुबळीहून पहाटे ५ वाजता सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्याला (Vande Bharat Express) पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी पुण्याहून दुपारी अडीच वाजता निघेल आणि रात्री दहा वाजता हुबळीला पोहोचेल. संपूर्ण प्रवासात प्रत्येक मार्गाने अंदाजे साडे आठ तास लागतील.

पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेस
पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस व्यतिरिक्त आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन देखील पुण्याहून धावणार आहे. पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेस देखील सुरू होणार आहे. पुणे-नागपूर मार्गासाठी विशिष्ट वेळा (Pune Nagpur vande bharat) आणि वारंवारता तपशील अद्याप अधिकृतपणे घोषित करण्यात आलेला नाही. प्रवाशांसाठी सोयीस्कर प्रवास वेळापत्रक लवकरच संबंधित प्रशासन जाहीर करेल, असा अंदाज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ सप्टेंबर रोजी देशभरातील ११ नवीन वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करणार आहेत. नागपूर-सिकंदराबाद, पुणे-हुबळी, टाटानगर-पाटणा, टाटानगर-ब्रह्मपुर, राउरकेला-हावडा, वाराणसी-देवघर, रांची-गोड्डा, आग्रा-बनारस, हावडा-गया, हावडा-भागलपूर, दुर्ग-विशाखापट्टणम या गाड्यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *