Assembly Election 2024 : यंदा सत्ता कोणाची ? महाराष्ट्राचा ओपिनियन पोल काय सांगतो?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ सप्टेंबर ।। राज्यात विधानसभा निवडणूक जवळ आलीय. त्यामुळे कोण सत्तेत येणार आणि कोण सत्तेबाहेर जाणार, हा प्रश्न सर्वांसमोर आहे. त्यामुळे विविध कंपन्यांच्या सर्वेक्षणातून अंदाज व्यक्त केला जातोय. साम टीव्हीने विविध कंपन्यानी दिलेल्या आकड्यांचा अंदाज घेत पोल ऑफ पोल सामटीव्हीने वर्तविला आहे. या सर्व सर्वेक्षणातून महाविकास आघाडी सत्तेच्या जवळ जाणार असल्याचं दिसतंय, तर महायुती सत्तेतून बाहेर जाणार असं दिसत आहे.

परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी छोट्या आणि अपक्ष उमेदवारांची मदत घ्यावी लागणार असल्याचं दिसतंय. महायुतीला १३५ तर महाविकास आघाडीला १४३ जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर इतर पक्षांना १० जागा मिळतील, अशी शक्यता आहे. तर महायुती सत्तेतून बाहेर जाताना दिसत आहे. त्यामुळे आता सध्या तरी महाविकास आघाडी यंदा विधानसभा निवडणुकीत बाजी मारेल, असे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *