Honda Amaze ला टक्कर देण्यासाठी येतेय New Maruti Suzuki Dzire; लाँचिंगपूर्वीच अगोदरच समोर आले डिझाइन, फीचर्स अन् बरंच काही…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ सप्टेंबर ।। भारतातील सर्वांत यशस्वी कार म्हणून मारुती सुझुकी डिझायरकडे पाहिले जाते. अशात कंपनी आता या कारचे नेस्क्ट जनरेशन एडिशन लवकरच भारतीय बाजारपेठेत सादर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने मारुती सुझुकीने या नव्या कारबाबतच्या काही बाबी टेस्टदरम्यानच रिव्हिल केल्या. यावेळी अधिकृत लॉन्च होण्यापूर्वी या कारचे संपूर्ण डिझाईन आणि फीचर्सबाबतची माहिती उघड झाली आहे.

मारुती सुझुकी नेक्स्ट जनरेशन एडिशन सादर करण्यापूर्वी कंपनीने हे सुनिश्चित केले आहे की, ही नवीन कार तिच्या हॅचबॅक मॉडेल स्विफ्टसारखी नसेल. या नव्या कारच्या डिझायरची स्पर्धा नवीन होंडा अमेझ, टाटा टिगोर व ह्युंदाई ऑरा यांच्याशी पाहायला मिळेल.

फीचर्स
मारुती सुझुकीने या कारचा फ्रंटपासून ते बॅकपर्यंत बाहेरील पूर्ण भाग नव्याने डिझाइन केला आहे. हे डिझाइन पाहताना ऑडीच्या आयकॉनिक बर्वेरियन बियर्ड ग्रिलची आठवण येईल. नवीन डिझायरमध्ये स्विफ्टच्या हनी कॉम्ब ग्रिलच्या जागी सहा स्लॅट्स आहेत. हे डिझायन जर्मन उत्पादन पाहून प्रेरित झाल्याने केल गेल्याचे दिसते. त्यात करेक्चर लाइन्ससह मस्कुलर व क्लीन बोनेट स्ट्रक्चर आहे. नवीन स्लीक हेडलाइट्स फोक्सवॅगन वर्ट्सशी मिळते-जुळते आहेत; तर फ्रंट बंपर हाऊस LED फॉग लॅम्पसारखे आहेत.

साइइला यात मेटल फिनिश विंडो सिल्स आणि सर्व नवीन ड्युअल-टोन अलॉय व्हीलसह एक प्रमुख शोल्डर लाइन आहे. स्पाय इमेजमधून दिसतेय की, डिझायरमध्ये सिंगल पॅनल सनरूफ असेल.

नवीन मारुती सुझुकी डिझायरचे आतील स्ट्रक्चर जरी वेगळे असले तरी केबिन स्विफ्टसारखीच असेल. त्यात नऊ इंचांची इन्फोटेन्मेंट सिस्टीम असे, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, ३६० अंशीय कॅमेरा व मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्लेसह ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असू शकते.

सेफ्टी फीचर्स
सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात सहा एअरबॅग्ज, हिल-होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) यांसारखी फीचर्स असू शकतात.

इंजिन स्पेसिफिकेशन्स
स्विफ्टप्रमाणे या डिझायरमध्ये १.२ लिटरचे तीन सिलिंडर्स असतील, जे ८० bhp आणि १११.७ Nm टॉर्क जनरेट करतील. हे दोन ट्रान्स्मिशनमध्ये उपलब्ध असेल; एक ५ स्पीड मॅन्युअल आणि दुसरे ५ स्पीड AMT. मारुती सुझुकीदेखील नंतर Dezire CNG देखील लाँच करील, अशी अपेक्षा आहे. ही नवी कार या दिवाळीत सादर केली जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *