गृहिणींचा आवडता ब्रँड Tupperwareचा ‘डबा बंद’ ? कर्जामुळे दिवाळखोरीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ सप्टेंबर ।। जगभरातील गृहिणींचा आवडीचा ब्रँड म्हणजे टप्परवेअर (Tupperware) होय. विविध पदार्थ साठवण्यासाठी टप्परवेअरचे डबे नाहीत, असे मध्यमवर्गीय घर शोधूनही सापडणार नाही. पण या दिग्गज कंपनीवर अखेर सूर्यास्त झालेला आहे. तब्बल १ ते १० अब्ज डॉलरच्या कर्जामुळे या कंपनीने अखेर दिवाळखोरी जाहीर केलेली आहे.

ही कंपनी अमेरिकेतील शेअर बाजारवार नोंदणीकृत आहे. अमेरिकेतील नियमांनुसार कलम ११ अंतर्गत या कंपनीने दिवाळखोरीसाठी अर्ज सादर केला आहे. ही बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिलेली आहे.

किचनमधला डबा म्हणजे टप्परवेअर
किचनमधील साठवणुकीचे डबे म्हटले की टप्परवेअर असे समीकरणं गेली काही दशके रुळलेले होते. या कंपनीने यासाठी विक्रीची अत्यंत वेगळी अशी कल्पना राबवली होती. थेट दुकानातून विक्री न करता महिलांच्या मार्फत साखळीपद्धतीने याची विक्री व्हायची. महिलांच्या अशा टप्परवेअर पार्टींमधून हे डबे विकले जायचे. टिकावू, हवाबंद, दिसायला आकर्षक, वेगवेगळे आकार यामुळे हे डबे किचनमध्ये आणि फ्रीजमध्ये स्वतःचे स्थान बनवून होते. (Tupperware)

काही वर्षांत ब्रँडला घरघर
पण गेल्या काही वर्षांत या ब्रँडला घरघर लागली. नव्या स्पर्धक कंपन्यांची भर पडू लागली आणि कंपनीला नफा कमवणे कठीण जाऊ लागेल. २०२०मध्ये या कंपनीला संकटांची चाहूल लागली होती. त्यानंतर या वर्षी जून महिन्यात या कंपनीने अमेरिकेतील फॅकट्री बंद केली आणि १५० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. (Tupperware)

कर्ज देणाऱ्या वित्त कंपन्यांसोबतची बोलणी अयशस्वी झाल्यानंतर या कंपनीने अखेर दिवाळखोरी जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *