Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
PCMC News : उद्या पिंपरी चिंचवड हद्दीतील पाणीपुरवठा राहणार बंद - Maharashtra 24

PCMC News : उद्या पिंपरी चिंचवड हद्दीतील पाणीपुरवठा राहणार बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ सप्टेंबर ।। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Municipal Corporation) क, फ, ई या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील पाणीपुरवठा उद्या १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी बंद राहणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजीचा पाणीपुरवठा अपुरा व कमीदाबाने होणार (Water Supply) असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या चिखली जलशुद्धीकरण केंद्र आणि तळवडे नदीजल उपसा केंद्र या ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या भोसरी RS2 सबस्टेशन येथे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे १९ सप्टेंबर रोजीचा वीजपुरवठा सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे क फ आणि ई या क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा सकाळी नियमित वेळेत होणार असून संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशीचा पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.

त्यामुळे सर्व नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने पाण्याचा वापर करावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *