महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ सप्टेंबर ।। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीची जागावाटपचा पेच जवळपास ८० टक्के संपल्याचे भाजप नेत्याने सांगितले. आता त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ७० जागांवर दावा करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. बुधवारी अजित पवार यांच्या निवस्थानी झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली.
बुधवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जवळपास ७० जागांची मागणी करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापले जाणार नाही अशी हमी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दिली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा ७० जागांवर दावा –
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे अजित पवार यांनी सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या निवस्थानी बुधवारी जागावाटपाची बैठक पार पडली. यामध्ये जवळपास ७० जागांची मागणी करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आलाय.
२०१९ ला राष्ट्रवादीचे ५४ आमदार निवडून आले होते. त्यात आणखी १५ ते १६ जागांची मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून केली जाणार आहे. याआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कडून ८० जागांची मागणी करणार अशी भूमिका मांडण्यात आली होती. मात्र आजच्या बैठकीत फक्त १५-१६ जागा वाढवून मागण्यांचा निर्णय घेण्यात आलाय. लवकरात लवकर महायुतीच्या जगावाटपाचा निर्णय व्हावा अशी भूमिका काही नेत्यांनी मांडण्यात आली.
आमदारांची बैठक, काही जणांची अनुपस्थिति –
अजित पवार यांच्या निवासस्थानावर बुधवारी रात्री ९ वाजता बैठक संपली. या बैठकीत आमदारांकडून मतदारसंघातून आढावा घेण्यात आला. बैठकीला सर्व आमदार यांना उपस्थित राहण्याचे आदेश असताना अनेक आमदार गैरहजर राहिले होते. वैयक्तिक कारण देत काही आमदारांची अनुपस्थिती दर्शवली होती. आमदार इंद्रनील नाईक यांच्या मतदार संघात आणि घाटी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम असल्याने ते अनुपस्थित होते. तर नवाब मलिक हे ही आजच्या बैठकीला अनुपस्थित होते.
राष्ट्रवादीची युवती संघटनेची बैठक, महत्वाच्या सूचना दिल्या
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युवती संघटनेची बैठक बुधवारी पार पडली. आमदार शिवाजी गर्जे, आमदार सुनील शेळके आणि प्रदेशाध्यक सुनील तटकरे यांच्या उपस्थित ही बैठक पार पडली. बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या उपस्थित अनेक युवती उपस्थीत होत्या. आता पर्यंतच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे युवतींना आदेश देण्यत आले आहेत.
मोफत शिक्षण बार्टी सार्थी ह्याचा निधी सर्वांपर्यंत पोहचविण्याच काम युवतींकडे सोपवण्यात आलेय. योजनांची स्वाक्षरी मोहीम युवती संघटना घेणार आहे. योजनांची रांगोळी काढून पक्षाचा प्रचार करणार, त्याशिवाय राज्यभर रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. मुलीच्या वसतिगृहात जनजागृती करा, गॅस सिलेंडर सारख्या योजना युवती लोकांपर्यंत पोहचवा, असे सांगण्यात आलेय.
