पुण्यात आजपासून (24 जुलै) लॉकडाऊन नसेल पण दहा दिवसांपूर्वी सारखी सर्व प्रकारची सुटही नसेल ; काय सुरु आणि काय बंद राहणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे – ता. २४ जुलै :कालपासून पुण्यातील लॉकडाऊन उठवण्यात आला असून शहरात पुण्यात आजपासून (24 जुलै) लॉकडाऊन नसेल पण दहा दिवसांपूर्वी सारखी सर्व प्रकारची सुटही नसेल असे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन उठवताना काही निर्बंध आम्ही कायम ठेवणार असल्याचे सांगितले. पुण्यात लोकांना त्यांची कामे आणि व्यवसाय करण्यासाठी काही गोष्टींबाबतचे निर्बंध वगळता 14 जुलैच्या आधीसारखीच परवानगी असेल.

पुण्यात यावर असेल निर्बंध :

सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत पुण्यातील दुकाने सुरू राहणार
अत्यावश्यक सेवेसाठी काम करणारे लोक वगळता इतर कोणालाही रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीत बाहेर पडता येणार नाही
पुण्यात येथून पुढे लग्न समारंभ आणि अंत्यविधीप्रसंगी वीस लोकांनाच उपस्थित राहता येईल.

पुण्यात यावर असेल सवलत :

प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सार्वजनिक ठिकाणी आणि मैदानांवर व्यायाम करता येईल. धावणे, सायकलींग करता येईल. मात्र जीम बंद राहतील.
सकाळी 5 ते 7 या वेळेत व्यायाम करता येणार
लहान मुलांसोबत मोठी व्यक्ती हवी , मैदानांवर गर्दी करता येणार नाही
व्यायामाची सामायिक उपकरण वापरता येणार नाहीत (ओपन जिम)
ऑड-इव्हन फॉर्म्युला नुसार दुकाने सुरू राहतील
खाजगी कार्यालय 10 टक्के किंवा 15 जण यापैकी जे अधिक तितक्या लोकांना बोलवून कामकाज करता येणार आहे.
हॉटेल्स, मॉल जीम, व्यापारी संकुल, पोहण्याचे तलाव बंदच राहणार
हॉकर्सना व्यवसाय सुरू करता येणार
पार्सल, कुरियर सुरू
घरमालकाची परवानगी असल्यास घरगुती कामगार , ज्येष्ठ रूग्ण मदतनीस (प्रतिबंधित क्षेत्राबाहेर)
सगळीकडे मास्क वापरणे अनिवार्य
ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण बाहेर पडता येणार नाही


दरम्यान जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी डॉक्टरांवर लक्ष ठेवण्यासाठी कोरोना सेंटरमधे आम्ही सीसीटीव्ही बसवत असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच या सीसीटीव्हीचे फुटेज पाहण्यासाठीच उपलब्ध असेल. कोरोना सेंटरमध्ये डॉक्टर येत आहेत का ? किती वाजता आणि किती वेळासाठी येत आहेत याची माहिती मिळणे यामुळे शक्य होणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हटले आहे. सिनियर डॉक्टर सेंटरला जात आहे का? आणि तेथील परिस्थिती काय होती हे समजावे यासाठी सीसीटीव्ही बसवले जात आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज सिव्हील सर्जन, प्रशासकीय अधिकारी यांना पाहण्यासाठी उपलब्ध असतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *