नांदेड ; 24 जुलैपासून सोमवार ते शुक्रवारी पर्यंत सकाळी 7 ते सायं. 5 पर्यंत दुकाने, खाजगी आस्थापनांना मुभा* जिल्हाधीकारी ड्रा.विपीन इटनकर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – नांदेड – ता. २४ जुलै :कोराना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात शुक्रवार 24 जुलै पासून सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुकाने व इतर खाजगी आस्थापना आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून (मिशन बिगीन अगेन) सकाळी 7 ते सायं. 5 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मुभा दिली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणुची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवार 24 जुलै 2020 पासून पुढील आदेशापर्यंत (Mission Begin Again) अन्वरये राज्य शासनाच्या सुचनेनुसार तसेच यापुर्वीच्या आदेशातील नमूद निर्देशानुसार नांदेड जिल्हnयात प्रतिबंधीत क्षेत्र वगळून खालीलप्रमाणे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मार्गदर्शक सुचना व आदेश निर्गमित केले आहेत.

संपूर्ण नांदेड जिल्हलयात पुढील प्रमाणे बाबी प्रतिबंधित राहतील
सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग इ. बंद राहतील. तथापि ऑनलाईन, आंतर शिक्षण यास मुभा राहील. हॉटेल / रेस्टॉररंट आणि इतर हॉस्पिटॅलिटीच्याद सेवा हया गृहनिर्माण, आरोग्या, पोलीस, शासकिय अधिकारी, आरोग्यस सेवा कर्मचारी, पर्यटकांसह अडकलेल्याह व्यऑक्ती आणि विलगिकरण सुविधेसाठी वापरता येईल. तसेच वरील सेवेसाठीच बसस्टॉ्प, रेल्वेमस्टेपशन येथे चालू असलेल्या कॅन्टीरनचा सुध्दात वापर करता येईल. रेस्टॉसरंटला खाद्यपदार्थाच्याव होम डिलेव्हशरीसाठी स्वायंपाकघर वापरण्या स मुभा असेल.

सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्यावयामशाळा व जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्लीश हॉल व इतर तत्स्म ठिकाणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृीतिक, धार्मिक कार्ये, इतर मेळावे आणि मोठया धार्मिक सभा यास प्रतिबंध असेल. सर्व धार्मिक स्थ्ळे, पुजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद ठेवण्यायत येतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, परिषदा इत्या,दीवर बंदी राहील.

जिल्ह्यात सायंकाळी 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू
संचारबंदी कालावधीत सायं 5 ते सकाळी 7 यावेळेत कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्यालवश्यृक सेवेकरिता नेमण्याात आलेले अधिकारी, कर्मचारी व वैद्यकिय कारणास्तमव रुग्णय व त्यांनच्याससोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील. यावेळेत विनाकारण फिरतांना आढळल्या्स अशा व्याक्तींाच्याअ विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्याात येईल.

सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यासवश्य क साधने व सुविधांची साठेबाजी, काळाबाजार करणाऱ्या विरुध्दष कठोर कारवाई करावी. तसेच वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्याळसाठी कुठल्यारही अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विरुध्दव कुठल्यांही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. हा आदेश दि. 19 जुलै 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *