महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ सप्टेंबर ।। सध्या प्रत्येकजण ऑनलाइन व्यव्हार करत आहेत. डिजिटल पेमेंटमुळे वेळ वाचतो. त्यामुळे यूपीआयचा वापर करुन तुम्ही पैसे पाठवू शकतात.फक्त क्यूआर कोड स्कॅन करायचा आणि पेमेंट करायचे असते. त्यामुळे अनेकांना व्यव्हार करणे सोपे झाले आहे. आता तर दुकानांपासून ते भाजीविक्रेत्यांपर्यंत सर्वांकडे यूपीआय स्कॅनर आहे. त्यामुळे अनेकजण रोकड स्वतः जवळ ठेवत नाही.
यूपीआयमुळे डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापरदेखील कमी झाला आहे. परंतु जर यूपीआयच्या व्यव्हारांवर चार्ज केले तर देशातील ७५ टक्के युजर्स ऑनलाइन पेमेंटचा वापर बंद करणार असं मत नोंदवले केले आहे. मिडिया रिपोर्टनुसार, फक्त चार जणांमध्ये एका व्यक्तीने शुल्क भरण्याची तयारी दाखली आहे.
लोकल सर्कल या संस्थेने केलेल्या या सर्व्हेत ही माहिती समोर आली आहे. यामध्ये नागरिकांच्या पेमेंट पद्धतीबाबत मते नोंदवण्यात आली. यामध्ये ३८ टक्के युजर्स हे ५० टक्क्यांपेक्षा जास्त वेळा व्यव्हार हे यूपीआयने करत असल्याचे समोर आले आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, २०२३-२४ वर्षात यूपीआयमध्ये होणाऱ्या व्यव्हारांमध्ये ५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यूपीआय व्यव्हारांना १०० अब्जांचा टप्पा पार केली आहे. दिवसेंदिवस यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्या युजर्सची संख्या वाढतच आहे.
केंद्रिय मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०२४-२५ या वर्षात पहिल्या पाच महिन्यांमध्ये डिजिट पेमेंटचे मूल्य वाढले असून १,६६१ लाख कोटींवर पोहचले आहे. तर या काळात डिजिटल पेमेंटची संख्या ८,६५९ कोटींवर पोहचली आहे. परंतु जर यूपीआय पेमेंटवर शुल्क आकारले गेले तर युजर्सचा डिजिटल पेमेंटचा वापर कमी होईल.
सध्या यूपीआयद्वारे सात देशांमध्ये व्यव्हार केले जातात. युएई, सिंगापूर, भूटान,नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स आणि मॉरीशस या देशांमध्ये यूपीआय व्यव्हार केले जातात.