पिंपरी-चिंचवड : लॉकडाउनच्या दहा दिवसांमध्ये 3 हजार 814 जण हे करोनामुक्त झाले तर तब्बल सहा हजारांहून जास्त करोनाबाधित रुग्णांची नोंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पिंपरी चिंचवड – ता. २४ जुलै : राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी करोना चा प्रादुर्भाव रोखण्याचा हेतूने स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या आठवड्यात सोमवारी मध्यरात्रीपासून दहा दिवसांचे कडक लॉकडाउन लागू करण्यात आले होते. त्याचा कालावधी गुरुवारी संपला. पण लॉकडाउन असतानाही शहरात अवघ्या दहा दिवसांमध्ये तब्बल 6 हजार 138 करोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 हजार 814 जण हे करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 149 जणांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, आजपासून शहरात लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली असून अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारी सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत खुली असणार आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांचे कडक लॉकडाउन लागू करण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरात पहिले 5 दिवस स्थानिक प्रशासनाने ठरवल्याप्रमाणे अत्यंत कडक पद्धतीने लॉकडाउन लागू केले. पोलीस बंदोबस्त अत्यंत चोख करण्यात आला, संचारबंदी लागू करण्यात आली. रस्ते, चौक, परिसर हे ओस पडले होते. स्थानिक नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, सहाव्या दिवशी नियम शिथिल केले आणि रस्त्यांवर नागरिकांची गर्दी वाढली. पहिल्या पाच दिवसांमध्ये नागरिक घराबाहेर पडले नाहीत. परंतु, सहाव्या दिवशी अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. पण लॉकडाउन असतानाही शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अवघ्या दहा दिवसांमध्ये तब्बल 6 हजार 138 करोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *