Pune: मेट्रो प्रवाशांसाठी ! जिल्हा न्यायालय स्थानक आज ५ तास राहणार बंद, कधी होणार सुरु?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ सप्टेंबर ।। जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मेट्रो मार्गाचे उद्‍घाटन गुरुवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्थानक दुपारनंतर पाच तास प्रवासी सेवेसाठी बंद राहणार आहे. सायंकाळी सातनंतर हे मेट्रो स्थानक प्रवाशांसाठी खुले केले जाईल, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

‘रामवाडी ते वनाज’ सेवा सुरू राहणार
जिल्हा न्यायालय इंटरचेंज मेट्रो स्थानक बंद ठेवण्यात येणार असले तरी रामवाडी ते वनाज दरम्यान मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. दुपारी दीडनंतर जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन बंद बंद असणार आहे. वनाज किंवा रामवाडीवरून येणाऱ्या प्रवाशांना पिंपरीच्या दिशेने प्रवास करायचा आहे, त्यांनी पुणे मनपा मेट्रो स्टेशनवर उतरावे. तेथून मोफत बसने शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला जावे. मेट्रो मार्गिकेचे उद्‍घाटन झाल्यानंतर सायंकाळी सातनंतर सेवा पूर्ववत होईल, असे हर्डीकर यांनी सांगितले.

मोफत पीएमपी सेवा
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे गुरूवारी दुपारनंतर जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन पाच तास बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन महामेट्रोने पर्यायी व्यवस्था केली आहे. गुरुवारी दुपारनंतर पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर अशीच मेट्रो सेवा सुरू राहील . मेट्रो जिल्हा न्यायालयापर्यंत जाणार नाही. प्रवाशांना शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर उतरावे लागेल. तेथून पुणे महापालिकेपर्यंत पीएमपीची मोफत सेवा असणार आहे. महापालिकेपासून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनासाठी ही मोफत बस सेवा असणार आहे .

रात्री साडेआठनंतर स्वारगेटपर्यंत सेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर रात्री साडेआठ वाजता मेट्रो सेवा प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहे. त्यानंतर ती इतर मार्गाप्रमाणे रात्री दहापर्यंत सुरू राहणार आहे. शुक्रवारपासून इतर मार्गाप्रमाणे ती गर्दीच्या वेळेला सात मिनिटे आणि इतर वेळेला दहा मिनिटांनी सुरू असणार आहे, अशी माहिती श्रावण हर्डीकर यांनी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *