Cyber Fraud Alert: फेक मेसेजपासून कायमची सुटका! फक्त ३ स्टेप्स लक्षात ठेवा अन् टेन्शन फ्री व्हा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ सप्टेंबर ।। देशभरातील लाखो नागरिक स्मार्ट फोन वापरत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात स्मार्ट फोनला खूप महत्व आहे. रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या स्मार्ट फोनमुळे आपल्या अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत. पण अनेकदा स्मार्ट फोन वापरत असताना कधी-कधी स्पॅम कॅाल्स, फेक मेसेज येत असतात. अनेकदा आपल्याला स्मार्ट फोनमूळे झालेल्या फसवणुकीच्या घटना पाहायला मिळतात. ज्यामुळे आपल्याला आर्थिक फटका बसतो. कधी कधी नागरिकांची या स्पॅम कॅाल्स आणि मेसेजमुळे मोठ्याप्रमाणात फसवणूक होत असते. या सर्व कारणांमुळे नागरिकांना अनेक गोष्टींना सोमोरे जावे लागते.

नागरिकांच्या या सर्व समस्यांवर उपाय काढण्यासाठी दूरसंचार विभागाने [DOT] ने तीन स्टेप्स आणल्या आहेत. यामुळे स्मार्ट फोन वापरणाऱ्या युजर्सची फसवणूक होणार नाही. या तीन स्टेप्समुळे युजर्स वेळेच्या अगोदरच सावध होणार आहे. दूरसंचार विभागाने फेक मेसेजेस आणि फ्रॉड कॅाल्सवर नियंत्रण आणण्यासाठी या तीन सूचना नागरिकापर्यंत पोहचवल्या आहेत.

सरकारने काही महिन्यांपूर्वी चक्षु नावाचे पोर्टल सुरु केले होते. चक्षु (Chaskhu) नावाचे पोर्टल सुरु करुन नागरिक आपल्या फ्रॉड कॅाल्स आणि मेसेजची तक्रार त्वरित करु शकत आहेत. त्याचबरोबर दूरसंचार विभागाने [ DOT]आणि TRAI ने ऑपरेटर्सना नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम सांगितले आहे. यामुळे नागरिकांना भविष्यात फेक कॅाल्स आणि मेसेज येणार नाही. म्हणून दूरसंचार विभागाने या पोर्टेलवरुन १ कोटीहून जास्त सिमकार्ड बंद केले आहेत.

दूरसंचार विभागाचे नारिकांना आवाहन
रोजच्या जीवनात वापरला जाणारा स्मार्टफोन फक्त कॅाल आणि बऱ्याच गोष्टींसाठी मर्यादित नाही. आपण स्मार्ट फोनमुळे अनेकदा पैशांचे व्यवहार करत असतो. स्मार्ट फोनचा वापर आपण इतर कारणांसाठी ही करतो. कधी कधी नागरिकांचा हाच निष्काळजीपणा त्यांना महागात पडतो. म्हणून दूरसंचार विभागाने नागरिकांना या सोप्या तीन स्टेप्स सांगितल्या आहेत.

स्मार्ट फोन वापरकर्त्यांना सरकारने काढलेल्या चक्षु पोर्टलचा वापर तक्रारीसाठी करता येणार आहे. दूरसंचार विभागाच्या X हँडलवर या बाबात माहिती देण्यात आली आहे.जर तुम्हाला पण स्पॅम कॅाल्स आणि मेसेजेस येत असतील तर, दूरसंचार पोर्टलला भेट द्या, यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *