Pune Metro News : पुण्यात आजपासून सुरू होणार जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्ग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ सप्टेंबर ।। पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून पुणेकरांच्या सेवेत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट असा मेट्रो मार्ग सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे लोकार्पण होणार आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संध्याकाळी ४ वाजता हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग आहे. या मार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई, स्वारगेट असे ४ मेट्रो स्थानके आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकर या मार्गाची वाट पाहत होते. मेट्रो मार्गामुळे पुणेकरांना आता कामासाठी कमीवेळात आणि झटपट प्रवास करता येणार आहे. मेट्रो सुरू होणार असल्याने पुणेकरांनी यावर आनंद व्यक्त केला आहे.

कसे असणार या मार्गावरचे तिकीट दर
जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ असा प्रवास करण्यासाठी १० रुपये आकारले जाणार आहे.

जिल्हा न्यायालय ते मंडईपर्यंत प्रवास करायचा असेल तर तुम्हाला १५ रुपयांचे तिकीट खरेदी करावे लागले.

जिल्हा न्यायालय ते स्वारगेटपर्यंत पोहचण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला १५ रुपयांचं तिकीट खरेदी करावं लागेल.

स्वारगेट ते मंडईपर्यंत अनेक व्यक्ती प्रवास करतात. तसेच येथील अंतर इतर अंतराच्या तुलनेत थोडे कमी आहे. त्यामुळे हा प्रवास करण्यासाठी तुम्हाला फक्त १० रुपयांचं तिकीट खरेदी करावं लागेल.

स्वारगेट ते कसबा पेठपर्यंत प्रवास करायचा असेल तर त्यासाठी १५ रुपये तिकीट आहे.

स्वारगेट ते जिल्हा न्यायालय या प्रवासासाठी सुद्धा १५ रुपये इतकंच तिकीट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी लोकार्पण सोहळा पार पडेल.

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थितीत राहणार आहेत.
सकाळी 11 वाजता गणेश क्रीडा मंदिर येथे या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात होणार आहे. दुपारी १२.३० ते १.०५ या दरम्यान पंतप्रधान दूरदृष्य प्रणालीद्वारे याचे उद्घाटन करतील. याच कार्यक्रमात स्वारगेट ते कात्रज या नवीन दक्षिण विस्तारित मार्गीकेचे भूमिपूजन देखील होणार आहे.

मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटन व भूमिपूजनाबरोबर पंतप्रधान मोदी सोलापूर विमानतळाचेही उद्घाटन करणार आहेत. पुण्यातील भिडेवाडा स्मारकाचे भूमिपूजन आणि बिडकीन प्रकल्पाचे राष्ट्राला समर्पण करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *