Interest Rate: सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी; बचतीवर व्याजदर जैसे थे वैसे; वाचा सविस्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑक्टोबर ।। सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. योजनांमध्ये किंवा एफडीमधील गुंतवणूकीवर व्याजदर जैसे थे वैसे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्थ खात्याकडून ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी व्याजदर जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने तिमाहीसाठी लघुबचत योजनांच्या व्याजदरात बदल केलेला नाही. वित्त मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. (Investment Scheme)

सध्या सर्वात जास्त व्याज हे सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर दिले जाते. ८.२ टक्के व्याजदर दिले जाे. यातील एक योजना मुलींसाठी तर दुसरी योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेवर ७.७ टक्के व्याजदर दिले जाते.

केंद्र सरकारने ३१ डिसेंबर २०२३ रोजी तिमाहीसाठी काही योजनांमध्ये व्याज वाढवण्याची घोषणा केली होती तरीही आवर्त ठेव वगळल्या कोणत्याही दरात बदल केलेला नव्हता.त्यामुळे आता नागरिकांना बचत योजनेवर तेवढेच व्याजदर मिळणार आहे.

१ वर्षासाठीच्या मुदत ठेव ६.९ टक्के व्याजदर मिळते. २ वर्षाच्या मुदत ठेवीवर ६.९ टक्के व्याजदर दिले जाते. ३ वर्षांच्या मुदत ठेवीसाठी ७ टक्के व्याजदर दिले जाते. ५ वर्षांच्या मुदत ठेवीसाठी ७.५ टक्के व्याजदर दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ८.२ टक्के व्याजदर दिले जाते. मासिक उत्पन्न योनेत ७.४ टक्के व्याजदर दिले जाते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेवर ७.७ टक्के व्याजदर दिले जाते.पब्लिक प्रोविडंट फंडमध्ये ७.१ टक्के व्याजदर दिले जाते.किसान विकास पत्र योजनेवर ७.५ टक्के व्याज दिले जाते.सुकन्या समृद्धी योजनेत ८.२ टक्के व्याज दिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *