पिंपरी चिंचवड महानगरपालिका सप्टेंबर २०२४ अखेर महापालिकेचे १९ कर्मचारी सेवानिवृत्त..

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑक्टोबर ।। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी गेली अनेक वर्षे अथक परिश्रम व प्रामाणिकपणे महापालिकेची सेवा करून शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत अमूल्य योगदान दिले आहे, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील आनंदी व आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे सप्टेंबर २०२४ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १९ कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, शितल वाकडे, लेखाधिकारी चारूशिला जोशी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे सनी कदम, बालाजी अय्यंगार, विजया कांबळे तसेच संजीव घुले, माया वाकडे आणि महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे सप्टेंबर २०२४ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये असिस्टंट मेट्रन अनघा भोपटकर, मुख्याध्यापक वसंत चिमटे, मुख्याध्यापिका मलेकासबा शेख, जयश्री सोनवणे, जानकी तोडकर, मुख्य लिपीक मुकुंद बहिरट, रमेश गावडे, स्टाफ नर्स वंदना नानिवडेकर, सुरक्षा निरीक्षक सुनिल काळभोर, मुकादम नितीन समगीर, अंकुश लांडे, दुर्गा वाडकर, मजूर चंद्रकांत फुगे, नानासाहेब पवार, सुर्यकांत सुरकुले, सफाई सेवक माया मोरे, आक्काबाई लोखंडे, जमना धारू तसेच गटरकुली अंबादास शेपूर यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *