Mahatma Gandhi jayanti: गांधीजींच्या ‘या’ अनमोल वचनांचे पालन केल्यास आयुष्यात व्हाल यशस्वी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑक्टोबर ।। आज देशभरात गांधी जयंती साजरी केली जात आहे. दरवर्षी 2 ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी केली जाते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. सत्य आणि अहिंसेच्या बळावर संपूर्ण इंग्रजांना भारताबाहेर जाण्यास भाग पाडले. आज त्यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया बापूंशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी आणि त्यांचे काही प्रेरणादायी विचार कोणते आहेत. तुम्ही त्यांच्या विचारांचे पालन करून आयुष्यात यश मिळवू शकता.

महात्मा गांधींचे जीवन
महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदरला झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्या त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली गांधीजींनी अहिंसक मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारताला 1947 ला स्वातंत्र्य मिळाले.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लढत असताना, महात्मा गांधींनी असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि भारत छोडो चळवळ यांसारख्या महत्त्वाच्या चळवळींचे नेतृत्व केले. अहिंसेबद्दलची त्यांची वचनबद्धता लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रांनी 2 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला आहे.

गांधीजींचे अनमोल वचन

भीती हा शरीराचा आजार नसून तो आत्म्याला मारतो.

स्वातंत्र्य जन्मासारखे आहे. जोपर्यंत आपण पूर्णपणे स्वतंत्र होत नाही तोपर्यंत आपण परावलंबी राहू.

चुका करण्याचे स्वातंत्र्य असल्याशिवाय स्वातंत्र्याला अर्थ नाही.

प्रथम ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, मग ते तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील आणि मग तुम्ही जिंकाल.

इतरांना मदत करणे हा आपल्या जीवनाचा उद्देश आहे.

काही करायचेच असेल तर प्रेमाने करा, नाहीतर करू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *