Gold Price Today: सोन्याने घेतली मोठी झेप ; रेकॉर्ड ब्रेक : पहा आजचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑक्टोबर ।। या वर्षी लग्नाचा मुहुर्त ठरला असेल आणि त्यासाठी दागिन्यांची खरेदी करणार आहात तर लगबग करा. सोन्याचा भाव आता दिवसागणिक वाढत असल्याने येत्या काही दिवसांतही सोन्याच्या किंमती गगनाला भिडणार आहे. आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमतींनी आतापर्यंतचा नवीन उच्चांक गाठला आहे. मोदी सरकारने आपल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात (बजेट) सोन्यावरील आयात शुल्क कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला. ज्यानंतर मौल्यवान धातू उच्चांकावरून प्रचंड घसरुन स्वस्त झाले. सोन्याचा भाव हा आता ६८१ रुपयांनी वाढला आहे.

सराफा बाजारात सोन्याची किंमत
सराफा बाजारात सोन्याची किंमत ही ७५,००० रुपयांचा वर गेली असून आता सणासुदीच्या दिवसात ग्राहकांच्या खिशाला जोरदार कात्री बसणार आहे. सणासुदीसोबतच आता लग्नाचा सीझन येणार असल्याने सराफा बाजारात दिवसागणीक सोन्याच्या किंमती नवनवीन उच्चांकच गाठणार आहे. सोन्याची किंमत आज ७५,००० रुपयांच्यावर गेली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७७,४५० इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ७१,००० रुपये आहे . सराफा बाजारात चांदीची झळ वाढलेली दिसली. आज चांदीची किंमत ही ९५,००० रुपये इतके आहे.

वायदे बाजारात सोन्याची किंमत
सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमतीत आज वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा बेंचमार्क ऑक्टोबर करार आज ६८१ रुपयांच्या वाढीसह ७५,५५० रुपयांवर उघडला. मागील बंद हा ७४,८४८ रुपयांवर झाला.

२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर

शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ७१,००० रुपये ७०,५०० रुपये
पुणे ७१,००० रुपये ७०,५०० रुपये
नागपूर ७१,००० रुपये ७०,५०० रुपये
कोल्हापूर ७१,००० रुपये ७०,५०० रुपये
जळगाव ७१,००० रुपये ७०,५०० रुपये

२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर
शहर आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ७७,४५० रुपये ७६,९१० रुपये
पुणे ७७,४५० रुपये ७६,९१० रुपये
नागपूर ७७,४५० रुपये ७६,९१० रुपये
कोल्हापूर ७७,४५० रुपये ७६,९१० रुपये
जळगाव ७७,४५० रुपये ७६,९१० रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *