IPO: या तारखेला देशातील सर्वात मोठा IPO येणार… तगड्या कमाईसाठी व्हा तयार ​

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑक्टोबर ।। आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मूळची दक्षिण कोरियाची ऑटोमेकर ह्युंदाईचे भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचा IPO लवकरच लॉन्च केला जाऊ शकतो जो भारतातील सर्वात मोठा आयपीओ असेल. देशांतर्गत शेअर मार्केटमधील अनेक लोक सध्या ह्युंदाई मोटर इंडियाच्या प्रस्तावित आयपीओच्या प्रतीक्षेत असून आता त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या प्रकरणाशी संबंधित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या २५,००० कोटी रुपयांच्या बहुप्रतिक्षित प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) १४ ऑक्टोबर रोजी येऊ शकते. ह्युंदाई मूळची दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी आहे.

ह्युंदाई आणणार भारतातील सर्वात मोठा आयपीओदक्षिण कोरिया-स्थित ह्युंदाई मोटरचा आगामी आयपीओ देशांतर्गत मार्केटमधील सर्वात मोठा असेल. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी LIC (भारतीय आयुर्विमा महामंडळ) २०२२ मध्ये २१ हजार कोटींचा आयपीओ लाँच केला होता. ह्युंदाईने आयपीओ मंजूरीसाठी जूनमध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे अर्ज केला होता ज्याला २४ सप्टेंबर रोजी हिरवा कंदील मिळाला.

ह्युंदाई मोटर इंडियाच्या IPO ची तारीख ठरली
आयपीओ दस्तऐवजानुसार, प्रस्तावित इश्यू पूर्णपणे प्रवर्तक ह्युंदाई मोटर कंपनीच्या १४,२१,९४,७०० शेअर्सच्या OFS वर आधारित असेल ज्यामध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. दक्षिण कोरिया-स्थित ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी प्रारंभिक शेअर विक्रीद्वारे किमान तीन अब्ज अमेरिकन डॉलर्स (सुमारे २५ हजार कोटी रुपये) उभारण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती यापूर्वी सूत्रांनी दिली होती.

ह्युंदाईचा आयपीओ जागतिक भू-राजकीय परिस्थितीत विशेषत: मध्य पूर्वेतील संघर्षाच्या स्थितीत लाँच होत आहे. परिस्थिती अधिक गंभीर झाली तर त्याचा परिणाम गुंतवणूकदारांच्या भूमिकेवर होऊ शकतो, आयपीओला नकारात्मक प्रतिसाद मिळू शकतात.

भारतीय ह्युंदाईचे कामह्युंदाई मोटर इंडियाने १९९६ मध्ये भारतात आपले ऑपरेशन सुरू केले आणि सध्या विविध विभागात १३ मॉडेल्सची विक्री करते. ह्युंदाईचा IPO यशस्वी झाल्यास २००३ मध्ये जपानी ऑटोमोबाईल निर्माता मारुती सुझुकी सूचीबद्ध झाल्यानंतर आता तब्बल दोन दशकांनंतर प्रथमच ऑटोमोबाईल निर्माता कंपनी आयपीओ लाँच करत आहे. देशातील दुसरी मोठी वाहन निर्माता ह्युंदाईचा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल ज्याद्वारे कंपनी सुमारे तीन अब्ज डॉलर्स उभारण्याची योजना आखत आहे. याअंतर्गत कंपनी १५ ते २०% हिस्सा विकू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *