महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०५ ऑक्टोबर ।। राज्यातील तिसऱ्या आघाडी बाबत बोलताना शरद पवारांनी टिंगल उडवली. तिसरी आघाडीच ऐकून मी घाबरलो आहो मला झोप लागत नाही,अस म्हणत शरद पवार यांनी खिल्ली उडवली. त्यावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी महात्मा गांधींचं प्रसिद्ध वाक्य सांगत शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले,शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांना टिंगल करण्याचा अधिकार आहे. इतर कोणी असत तर मी खपवून घेतलं नसतं. महात्मा गांधी कायम म्हणायचे आधी दुर्लक्ष करतील मग टिंगल करतील आणि मग ते लढतील नंतर तुम्ही जिंकाल… हे महात्म गांधींचं प्रसिद्ध वाक्य सांगत संभाजीराजेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं.