आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविंद्र भेगडे यांच्या स्नेह मेळाव्यास नातेवाईक मित्र परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑक्टोबर ।। आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने , भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांनी कुंडमळा , इंदोरी येथे कौटुंबिक , नातेवाईक , आप्तेष्ट मित्र परिवार यांचा स्नेहभोजन मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला रविंद्र आप्पा भेगडे यांच्या नातेवाईक आणि आप्तेष्ट यांनी जोरदार उपस्थिती लावत , रविंद्र भेगडे यांना आपला सक्रिय पाठिंबा असल्याचे दाखवून दिले. भेगडे परिवाराचा कौटुंबिक विस्तार , मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात असल्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर , या गोतावळ्याचा निश्चितच फायदा होणार आहे.

या स्नेहमेळाव्याला संबोधित करताना रविंद्र आप्पा भेगडे म्हणाले , “इतकं प्रेम करणारी हे स्नेहीजण स्व. दिगंबरदादा आणि माझ्या परिवारातील जेष्ठ मंडळींमुळे माझ्याशी जोडली गेली आहेत. ते कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होत राहीले म्हणुन इतका गोतावळा माझ्यासोबत उभा आहे. स्व. दादांची पुण्याई माझ्या पाठीमागं उभी आहे ही जाणीव बळकट झाली. आपल्या सर्वांच्या सोबतीने आपण माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी निष्ठेने लढा देईल.”

याप्रसंगी नातेवाइकांसह रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *