Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
“शरद पवारांना सोडून गेलेल्या ‘या’ 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री!” - Maharashtra 24

“शरद पवारांना सोडून गेलेल्या ‘या’ 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री!”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०५ ऑक्टोबर ।। जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसतशी शरद पवार गटाची ताकद आता दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकताच इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील घोषणा केली.

हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यांतर आता शरद पवार गटात आता अजित पवार गटाचा आणखी एक बडा नेता प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी आपला मुलगा रणजितसिंह शिंदे तुतारी किंवा अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची मोठी घोषणा केली असतानाच माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलंय. शरद पवार यांना सोडून गेलेल्या ९ जणांना पुन्हा पक्षात प्रवेश नाही. त्या ९ मंत्र्यांना पुन्हा राष्ट्रवादीत घ्यायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे, असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. नागपुरात बोलत असताना ते असं म्हणाले की, ‘आमचा राष्ट्रवादी काँग्रेस जो शरद पवारांचा पक्ष आहे. त्यांनी ठरवून टाकलं आहे, आमच्या पक्षातून साहेबांना जे सोडून गेले ते सात आठ नऊ लोकं जे सध्या मंत्री आहेत. त्यांना कोणालाच पक्षात पुन्हा घ्यायचं नाही, असं आमच्या पक्षात ठरलं आहे’, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *