Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Good News : तळवडेतील बायोडायर्व्हसिटी पार्कची पायाभरणी - Maharashtra 24

Good News : तळवडेतील बायोडायर्व्हसिटी पार्कची पायाभरणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ ऑक्टोबर।। पिंपरी-चिंचवड शहराच्या लौकीकात भर घालणारा ‘बायोडायर्व्हसिटी पार्क’ (जैवविविधता उद्यान) तळवडे येथे विकसित करण्यात येत आहे. सुमारे ७० एकर जागेत होणारा हा प्रकल्पामुळे निसर्ग परिसंस्थेचा जीर्णोद्धार होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

भोसरी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी तळवडे येथे ‘बायोडायर्व्हसिटी पार्क’ विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी महानगरपालिका, राज्य सरकारकडे सातत्त्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे. राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा’ योजनेतून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.

दरम्यान, आमदार महेश लांडगे यांचे समर्थक आणि तळवडेतील ग्रामस्थांनी प्रस्तावित जागेत कोनशीला पूजन केले आणि प्रत्यक्षात भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी गोपाळ भालेकर, शांताराम भालेकर, रमेश भालेकर, संभाजी भालेकर, दत्तात्रय नखाते, बंडू भालेकर, रामदास मोरे, अस्मिता भालेकर, वैशाली भालेकर, सुषमा पाटील, निलेश भालेकर, शरद भालेकर, सोमनाथ मेमाणे, शंकर भालेकर, प्रमोद भालेकर, अमोल भालेकर, पंकज आवटे, युवराज भालेकर, सुरज काळोखे, महेश कुडपणे, महेश भालेकर, संपत भालेकर, भानाशेठ भालेकर, पांडुरंग भालेकर, पांडाभाऊ साने, दिनेश भालेकर, अमोल वाळुंज, किरण नखाते, रामदास कुटे, अजित भालेकर, बंटी भालेकर, सोन्या भालेकर, संपत बाठे आदी उपस्थित होते.

महापालिका सहशहर अभियंता मनोज सेठिया म्हणाले की, तळवडे येथील जैवविविधता उद्यान मानव आणि निसर्ग यांच्यातील अधिक शाश्वत आणि सामंजस्यपूर्ण सहअस्तित्वाचा मार्ग प्रकाशित करेल. पुनर्संचयित उपक्रम, शैक्षणिक कार्यक्रम आणि सामुदायिक सहभाग याद्वारे पार्क जागरूक पर्यावरणीय कारभाराच्या परिवर्तनीय शक्तीचे उदाहरण देईल. या पुनरुज्जीवित लँडस्केपच्या सौंदर्याचा विचार करता भविष्यातील शहराच्या सौंदर्याला आकार देईल. जैवविविधतेचे संरक्षण ही केवळ गरज नाही, तर एक सामूहिक जबाबदारी आहे.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस अमृत गटात राज्य स्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. तसेच, भूमी थीमॅटिक पार्कमधील उच्चतम कामगिरीसाठीही बक्षीस मिळाले आहे. अशी एकूण १० कोटी रुपयांची रक्कम प्रकल्पाच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे. तसेच, उर्वरित खर्च केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीकरिता राज्यांना विशेष सहाय्य योजनेंतर्गत राज्य शासनास प्राप्त अर्थसहाय्य निधीमधून जैवविविधता उद्यान (बायोडायर्व्हसिटी पार्क) विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य मिळवण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.

…. असे आहे बायोडायर्व्हसिटी पार्क
बायोडायव्हर्सिटी पार्कचे नियोजन सुमारे ७० एकर जागेत केले आहे. याठिकाणी देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. किंबहुना जंगल विकसित करण्यात येणार आहे. प्राणी, पक्षी अधिवास या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे. मृदा संवर्धन, विविध थीमद्वारे वृक्षारोपण, एन्ट्रान्स गेट, बर्ड नेस्ट वॉल, पार्किंग, गोल्फ कार्ट ॲन्ड सायकल स्टेशन, ३ एन्ट्रान्स प्लाझा, ॲम्पिथिएटर, सोयुवेनिअर शॉप, वर्कशॉप, कॅपे, बटरफ्लाय गार्डन, रिपेरिअन ॲन्ड वेटलँन्डस, ऑर्चिडट्रम, थीम पार्क- कलर्स् ॲड कोअर फॉरेस्ट, टॉयलेट ब्लॉक्स, बायो डिझास्टर, किऑक्स, स्ट्रिम क्रॉसिंग, साइनेज, साईनेज ॲन्ड ग्राफीक फॉर इकॉलॉजी अवेअरनेस, बेन्चेस, लाईटिंग- जनरल लाईटींग, पाथवेज, पिकनिक स्पॉट, रेस्टॉरंट एरिआ, ब्रिज लाईटिंग, व्हिजीबिलीटी लाईटिंग फॉर साईट, पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, वेस्ट मॅनेजमेंट, साईल ॲन्ड वेस्ट वॉटर मॅनेजमेंट असा अत्याधुनिक सोयी-सुविधांचा बायोडायव्‍हर्सिटी पार्क पिंपरी-चिंचवडच्या सौंदर्यामध्ये भर घालणार आहे.

पिंपरी-चिंचवड परिसरातील जैवविविधता टिकावी. त्याचे संवर्धन व्हावे. निसर्ग परिसंस्थेचे जतन व्हावे. भावी पिढीला स्वच्छ हवा आणि नैसर्गिक सहवास लाभावा. या करिता जैवविविधता उद्यान विकसित करण्याचा संकल्प केला होता. आज या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. याचे मोठे समाधान आहे. या प्रकल्पाला भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येतील, असा विश्वास वाटतो.

– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *