महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ ऑक्टोबर ।। रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच यांच्या वतीने , शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने जिल्हा परिषद शाळा प्रांगण , टाकवे बु. येथे होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र आप्पा भेगडे यांच्या सौभाग्यवती डॉ.उज्ज्वलाताई भेगडे यांची प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमास होती. महिलांनी यावेळी डॉ.उज्वलाताई रविंद्र आप्पा भेगडे यांचे जल्लोषपूर्ण स्वागत केले.
मनोरंजक खेळ ,गप्पा आणि उखाणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. निवेदक अक्षय मोरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे सादरीकरण केले गेले. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक फ्रीज आणि पैठणी , द्वितीय एलएडी टीव्ही आणि पैठणी , तृतीय कुलर आणि पैठणी , चतुर्थ क्रमांक ओव्हन मशीन आणि पैठणी आणि पाचव्या क्रमांकासाठी गॅस शेगडी आणि पैठणी अशी बक्षिसे निर्धारित करण्यात आली होती. तर , स्पर्धेसाठी उपस्थित महिला वर्गासाठी , लकी ड्रॉ पद्धतीने , प्रथम क्रमांक वॉशिंग मशीन आणि पैठणी , द्वितीय क्रमांक मिक्सर आणि पैठणी , तृतीय क्रमांक कुकर आणि पैठणी , चतुर्थ क्रमांक डीनर सेट आणि पैठणी अशी बक्षिसे निर्धारित करण्यात आली होती.
या स्पर्धेत , प्रथम बक्षीस – निकिता अक्षय आसवले , द्वितीय – मंदा नगरकर , तृतीय – भारती कोंडे , चतुर्थ क्रमांक – किरण खरमारे तर , पाचवा क्रमांक – पूजा गायकवाड लकी ड्रॉ स्पर्धेत , अनिता जगताप – पहिले बक्षीस ,सुरेखा अंकुश आसवले -दुसरे बक्षीस , करुणा भीमप्रसाद शर्मा- तिसरा क्रमांक , सेजल किरण गायकवाड – चौथा क्रमांक या महिलांनी बक्षिसे पटकावली.
याप्रसंगी , मनोगत व्यक्त करताना डॉ.उज्वला भेगडे म्हणाल्या की , “ग्रामीण भागातील महिलांना चूल , मूल आणि शेतीची कामे यांतून आनंदाचे चार क्षण मिळावे या उद्देशाने आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जिंकलेल्या सर्व महिला-भगिनींचे हार्दिक अभिनंदन. आपले आशीर्वाद आणि पाठिंबा सदैव ” रविंद्र आप्पा भेगडे ” यांच्या पाठीशी राहुद्या अशी साद त्यांनी महिला भगिनींना घातली.
याप्रसंगी , उपसरपंच सौ.प्रतीक्षा ताई जाधव, सौ.मंगलताई टेमघिरे, सौ.वंदनाताई कदम, श्री.स्वप्नील असवले,प्रशांत शिंदे व रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच चे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व टाकवे बु. पंचक्रोशीतील माता व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.!
