महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑक्टोबर ।। Today’s Gold Silver Rate : सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. जर तुम्ही देखील सोन्या-चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असात तर आजचे दर नक्की पाहा, कारण दसऱ्यानंतरही सोन्याच्या दरात आणखी वाढ झाली आहे. यात येत्या काही दिवसात हे दर आणखी वाढू शकतात असे अंदाज वर्तवला जात आहे, कारण दिवाळी, धनत्रयोदशी असे विशेष सण आहेत. या काळात मोठ्याप्रमाणात लोक सोने-चांदी खरेदी करतात. पण आज तुमच्या शहरात नेमके सोन्या-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊ…
भारतात आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ७६, ४३० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९१,८६० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास, सोन्याचा दर आता ७६ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. तर १ किलो चांदीचे दरही ९० ते ९३ हजार रुपयांच्या दरम्यान कमी जास्त होत आहे, सोनं-चांदी खरेदी येत्या काही दिवसांत असेच वाढत गेले तर ते खरेदी करणं आता सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जाईल.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७६,४३० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ७०,०६१ रुपये आहे तर १ किलो चांदी ९१,८६० रुपयांनी विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीचा दर ९१९ रुपये आहे.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,५२० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७५,८४० रुपये आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६२४ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,८४० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६२४ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,५९० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६२४ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,५९० रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)