महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑक्टोबर ।। हेल्दी आणि फिट राहण्यासाठी सध्या प्रत्येक व्यक्तीने वर्कआउट करणं गरजेचं आहे. दररोज वर्कआउट केल्याने आपलं शारीरीक आणि मानसिक स्वास्थ छान राहते. त्यामुळे संपूर्ण दिवस देखील छान जातो. नवनवीन कामे करण्यासाठी आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. पुरुषांना जर हेल्दी रहायचं असेन तर त्यांनी रोजच्या रुटीनमध्ये धनुरासन केलंच पाहिजे. अशा पद्धतीने योगा केल्याने पुरुषांना बरेच फायदे होतात. त्याचबद्दल आज जाणून घेणार आहोत.
असे करा धनुरासन
धनुरासन योगा फार जुन्या काळापासून चालत आला आहे. हा योगा करणे अगदी सोपं आहे. तुम्हाला रोज फक्त एक एक स्टेप फॉलो करावी लागेल. यासाठी तुम्हाला सर्वात आधी जमिनीवर उलटे पोटावर झोपावे लागेल. जमिनीवर झोपल्यानंतर तुमचे दोन्ही पाय गुडघ्यातून बेंड करा आणि उलट करा. त्यानंतर दोन्ही हातांनी मागून पाय पकडा. तसेच तुमची मान सुद्धा वरची उचलून घ्या. मान खाली जमिनीला टेकणार नाही याची काळजी घ्या. अशा पद्धतीने तुम्ही धनुरासन करू शकता.
स्ट्रेंथ आणि फेक्सिबीलीटी
धनुरासन असा योगा आहे ज्यामध्ये तुमच्या शरीराला स्ट्रेंथ आणि फेक्सिबीलीटी मिळते. तसेत शरीर चपळ होते. काम करताना तुम्हाला ताण जाणवत नाही. तसेच ज्या व्यक्तींना खांदे दुखीचा त्रास आहे त्यांचे खांदे नॉर्मल होतात आणि अजिबात दुखत नाहीत.
डायजेस्ट सिस्टम
धनुरासन केल्याने आपल्या शरीरातील हात, पाय, पोट आणि मान अशा सर्वच अवयवांवर ताण येतो. यामुळे आपली पचनक्रीया सुधारते. ज्या व्यक्तींना अन्न लवकर पचत नाही त्यांनी हे आसन केले पाहिजे. यामुळे भूक देखील जास्त लागते.
स्ट्रेस कमी होतो
पुरुषांचं मन फार नाजूक असतं. ते कितीही कठोर वाटले तरी देखील मोठी दु:ख पचवण्याची ताकद त्यांच्यात नसते. काम, नोकरी, घर आणि परिवारातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी पुरुषांच्या खांद्यावर असते. त्यामुळे या सर्वांमुळे त्यांच्या डोक्यावरील ताण जास्त वाढतो. हा त्रास दूर करण्यासाठी पुरुषांनी धनुरासन केलं पाहिजे.
टीप : वरील लेख सामान्य माहितीवर आधारित आहे त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.