सुमारे १८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण धुमधडाक्यात
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑक्टोबर ।।तळेगाव दाभाडे, १२ ऑक्टोबर – तळेगाव दाभाडे शहरातील विविध अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामास सुरूवात झाली असून हे सर्व रस्ते दिवाळीच्या आधी पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी (शुक्रवारी) दिली.
तळेगाव दाभाडे शहरातील सुमारे १७ कोटी ७१ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार शेळके यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे,कृष्णा कारके, रवींद्र दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे,रामभाऊ गवारे, निखील भगत,सुरेश चौधरी, यादवेंद्र खळदे,दिलीप खळदे,सुरेश दाभाडे,संतोष दाभाडे, विशाल दाभाडे, अनिकेत भेगडे,बाबुलाल नालबंद, बाबा मुलाणी, आयुब सिकीलकर,संकेत खळदे, संजय बाविस्कर, विभावरी दाभाडे, शोभा भेगडे, शैलजा काळोखे, शबनम खान, संग्राम जगताप, आशिष खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार शेळके म्हणाले की, गेल्या पाच वर्षात कोरोनासह अनेक अडचणींवर मात करीत तळेगाव दाभाडे शहरातील विविध विकासकामांसाठी आपण जास्तीत जास्त निधी मिळवून दिला. कामांसदर्भात नागरिकांच्या अपेक्षा खूप असतात. नागरिकांना अपेक्षित असलेली विकास कामे, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
भूमिपूजन झालेल्या कामांपैकी बहुतांश कामे ही दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना आदेश देण्यात आले आहेत. प्रयत्न करूनही दिवाळीपूर्वी होऊ न शकलेली कामे निवडणुकीनंतर लवकरात लवकर पूर्ण केली जातील, असे त्यांनी सांगितले.
तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दवाढीच्या प्रस्तावाला देखील निवडणुकीनंतर लगेच राज्य शासनाची मंजुरी घेण्यात येईल. त्यामुळे नगर परिषद हद्दीलगत असलेल्या भागांमधील नागरिकांना आणखी चांगल्या नागरी सुविधा देणे शक्य होईल, असे शेळके म्हणाले.
सिद्धीविनायक सोसायटी, मोहननगर अंतर्गत रस्ता, संत ज्ञानेश्वर शाळेमागील रस्ता, गोदाई नगर येथील रस्ता, सत्यकमल कॉलनीमधील रस्ते, रेव्हेन्यू कॉलनी येथील डी.पी.रस्ता व अंतर्गत रस्ते, ओंकारनगरमधील अंतर्गत रस्ते, यशवंतनगरमधील बालाजी मंदिर ते रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता, स्टेशन चौक ते एसटी स्टॅंड ते नाचखिंड वस्ती, जुने सेवाधाम हॉस्पिटल समोरील रस्ता, मावळ लँड अंतर्गत रस्ते, सूर्यकिरण फार्मा सोसायटी गराडे यांचे घराजवळील रस्ता डांबरीकरण करणे, पारिजात सोसायटी येथील समाजमंदिर दुरुस्ती व सुधारणा करणे, विठ्ठलवाडी हद्दीतील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे, बनेश्वर स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता भुयारी गटर व कॉंक्रिटीकरण करणे. कुंभार वाडा, खंडोबा माळ मधील अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे.मारुती मंदिर चौक ते डाळ आळी गणपती मंदिर ते नालबंद गल्ली पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे या कामांचे भूमिपूजन आमदार शेळके यांच्या हस्ते झाले.
चावडी चौक येथील चाळीस लक्ष निधीतून बांधण्यात आलेल्या मंडल अधिकारी व तलाठी कार्यालय इमारतीचे लोकार्पण आमदार शेळके यांच्या हस्ते झाले.सुभाष चौक येथे नवीन पोलीस स्टेशन इमारत बांधणे या कामांचेही भूमिपूजन करण्यात आले.