चिंचवड विधानसभा मतदार संघात भाऊसाहेब भोईर प्रचारात दोन पाऊल पुढे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑक्टोबर ।। चिंचवड।।  चिंचवड विधानसभा इच्छुक भाऊसाहेब भोईर आपला पूर्ण राजकीय अनुभव व दांडगा जनसंपर्क या जोरावर मतदार संघावर आपली पकड मजबूत करतांना दिसत आहे. एव्हाना प्रचारात ते इतर उमेदवारांच्या दोन पाऊल पुढे आहेत.. ते आगामी विधानसभा अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. त्यातच राजकीय डाव टाकण्यात भाऊसाहेब भोईर हे मुत्सद्दी राजकारणी असल्यामुळे भाजपचे शंकर जगताप यांचा तसेच इतर इच्छूक उमेदवार यांचा निभाव लागेल की नाही हा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला.

घराणेशाही आणि झुंडशाहीला मी झुकणार नाही. माझ्यावर अन्याय झाला असून, माझ्यासाठी सर्व पक्षांचे दरवाजे खुले आहेत. असा इशारा नुकताच पत्रकार परिषदेतून भोईर यांनी दिला होता. 

अचूक रणनीती आखून जून महिन्यापासून ते विधानसभेची तयारी करत आहे. आत्तापर्यंत एक लाख लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत.

कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चिंचवड विधानसभेत घरोघरी प्रचार, विधानसभेतील रखडलेली काम नागरिकांच्या समस्या, यावर बोट ठेऊन नागरिकांना दिलेल्या आश्वासनांना कसा हरताळ लावण्यात आला , पाणी पट्टी भरून टँकर ला लाखो रुपये का? ट्राफिक ची समस्या ,असे प्रभावी मुद्दे आहेत, एकंदरीत महागाईने त्रस्त झालेली जनता, दर निवडणुकात आश्वासनाची तीच गाजर , इतर उमेदवार अजून ही चाचपणी करत आहेत त्यामध्ये भाऊसाहेब भोईर यांची प्रचारात आघाडी च दिसतेय..

जनसामान्यांशी नाळ जोडलेले भाऊसाहेब भोईर हे पिंपरी-चिंचवडमधील सर्वात अनुभवी राजकारणी आणि समाजकारणी आहेत. मात्र वेळोवेळी पक्षाकडून त्यांच्या वाट्याला अन्याय आला आहे. चिंचवड विधानसभेचे नेतृत्व २००९ सालीच मिळाले असते, परंतु युती धर्म न पाळल्यामुळे भाऊसाहेबांना त्याचा फटका बसला. त्यांच्या राजकीय अनुभवासमोर चिंचवड विधान सभेत कोणाचा निभाव लागेल असा राजकीय व्यक्ती सध्या तरी पहायला मिळत नाही.

एव्हढेच काय तर भाऊसाहेब यांचे कला क्षेत्रातील योगदान व विविध समाजउपयोगी राबवलेले उपक्रम तसेच अनेक नगरसेवकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, मित्र परिवार, आणि प्रचारात घेतलेली आघाडी, या सर्व बाबींचा आढावा घेतला असता भाऊसाहेब भोईर हे निर्विवादपणे चिंचवड विधान सभेतून लिलया निवडून येतील एव्हढे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *