महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ ऑक्टोबर ।। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर झाली. सुनील टिंगरे, काका पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दुसऱ्या यादीची घोषणा केली. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांना घेरण्यासाठी अजित पवार यांनी मोठा डाव टाकलाय. अजित पवार यांनी निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपमधून आलेल्या काही उमेदवारांना संधी दिली आहे. त्यात काका पाटील, निशिकांत पाटील, प्रताप पाटील चिखलीकर यांचा समावेश आहे. तर काँग्रेसमधून आलेल्या झिशान सिद्दीकी यांनाही मैदानात उतरवलेय.
बुधवारी अजित पवार यांनी ३८ जणांच्या उमेदवारीची पहिली यादी जारी केली होती. आता ७ उमेदवारांची यादी जाहीर झाली. एकूण ४५ उमेदवारांची घोषणा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत करण्यात आली आहे.
दुसऱ्या यादीत कुणाला मिळाली उमेदवारी?
वडगाव शेरी – सुनील टिंगरे
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी
अणूशक्तीनगर – सना मलिक
तासगाव – संजय काका पाटील
इस्लामपूर – निशिकांत पाटील
शिरुर – माऊली कटके
लोहा-कंधार – प्रताप पाटील चिखलीकर
झिशान सिद्दीकी, सना मलिक, सांगलीचे काका पाटील, भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला. काका पाटील यांना तासगावमध्ये उमेदवारी देण्यात आली. तर निशिकांत पाटील यांना जयंत पाटील यांच्याविरोधात इस्लामपूर येथून उमेदवारी दिली. झिशान सिद्दीकी यांना वांद्रे येथे वरुण सरदेसाई यांच्याविरोधात मैदानात उतरवम्यात आलेय. दरम्यान, नवाब मलिक यांचे तिकीट कापल्याचे समोर आलेय. त्यांची मुलगी सना मलिक यांना अणुशक्तीनगरमधून उमेदवारी देण्यात आली.