![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३०ऑक्टोबर ।। पावसाळा संपला तरी देखील राज्यात पावसाने विश्रांती घेतली नाही. नवरात्रोत्सव संपला तरी देखील पाऊस गेला नाही. दिवाळीवर देखील पावसाचे सावट आहे. दिवाळीला सुरूवात झाली ऐन दिवाळीमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल. तर विदर्भात फक्त पावसाचा अंदाज आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबरला फक्त विदर्भातच पाऊस पडेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यात फक्त ढगाळ वातावरण राहिल. तर विदर्भातील अकोला, वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित किरकोळ पाऊस राहिल. तर ३० उर्वरित जिल्ह्यात फक्ते स्वच्छ वातावरण राहिल.
हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील २ दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. ३० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात मेघ गर्जनेसह, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.
राज्यातील पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. राज्यात रब्बी हंगाम सुरू झाला आहे. शेतामध्ये पेरणीच्या कामाला वेग आला आहे. अशामध्ये सध्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता आहे.
