महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ नोव्हेंबर ।। भारत आणि न्यूझीलंड यांच्याचील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
तर भारतीय संघ गोलंदाजी करताना दिसून येणार आहे. भारतीय संघ या मालिकेत २-० ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघ हा सामना जिंकून व्हॉईटवॉश वाचवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आलेला आहे.
भारतीय संघासाठी अतिशय महत्वाच्या अशा सामन्यात प्लेइंग ११ मध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहला या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. तर त्याच्या जागी जसप्रीत बुमराहला संधी देण्यात आली आहे.
या एकमेव बदलासह भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर मालिकेत २-० ने आघाडीवर असलेल्या न्यूझीलंड संघातही २ मोठे बदल करण्यात आले आहेत. गेल्या सामन्यातील न्यूझीलंडच्या विजयाचा हिरो मिचेल सँटनरला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी ईश सोडीला संधी दिली गेली आहे. तर दुसरा मोठा बदल म्हणजे,टीम साऊदीलाही विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११
न्यूझीलंड – टॉम लेथम (कर्णधार), डेवोन कॉनव्हे, विल यंग, रचिन रविंद्र, डेरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोढी, मॅट हेनरी, एजाज पटेल, विल्यम ओ’रुर्क.
भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.